चार लाख वीस हजारांचे 18 मोबाईल नागरिकांना केले परत तोफखाना पोलिसांची कामगिरी

अहमदनगर दि. 19 ऑक्टोबर (प्रतिनिधी )- तोफखाना पोलिसांनी चोरीला गेलेले व हरवलेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे २० महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. तोफखाना पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांनी मूळ तक्रारदारांना मोबाईल परत केले आहेत.
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना सूचना द्दिले होते त्या नुसार पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलिस अंमलदारांना यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीतील तब्बल चार लाख वीस हजार रुपये किमतीचे 18 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर तोफखाना पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग तसेच आयफोन कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही तक्रारदारांनी गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही सोडून दिली होती. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी तोफखाना पोलिसांचे आभार व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सापोनि नितीन रणदिवे,पोसाई सचिन रनशेवरे ,पोहेको संतोष गर्जे, पोहेका सुनील शिरसाठ,पोना भानुदास खेडकर,पोका सुमित गवळी, पोना सलीम शेख पोका राहुल म्हस्के तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ शिंदे यांनी कारवाई केली.