कौतुकास्पद

संगमनेर सबजेल मधील न्यायालयीन कोठडीतुन पळुन गेलेले 4 आरोपी व त्यांना वाहनातुन पळुन जाण्यास मदत करणारे आरोपीसह जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई


अहमदनगर दि.10 नोव्हेंबर (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 08/11/2023 रोजी संगमनेर सबजेलमधील बॅरेक क्रमांक 3 मधील न्यायालयीन कोठडीतील आरोपी 1) राहुल देविदास काळे वय 31 वर्षे, रा. वडगांव पान, ता. संगमनेर, जि. अहमदनगर (संगमनेर तालुका पो. ठाणे गु.र.नं. 61/2020 भादवि कलम 302, 307), 2) रोशन उर्फ थापा रमेश ददेल वय 25 वर्षे, रा. इंदीरानगर (संगमनेर शहर पो. ठाणे गु.र.नं. 419/2021 भादवि कलम 376) 3) मच्छिंद्र मनाजी जाधव वय – 33 वर्षे, रा. घारगावं साकुर, ता. संगमनेर (घारगांव पो. ठाणे गु.र.नं. 165/2022 भादवि कलम 302, 307), 4) अनिल छबु ढोले वय – 40 वर्षे, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर (संगमनेर शहर पो. ठाणे गु.र.नं. 511/2021 भादवि कलम 376) हे न्यायालयीन कोठडीमध्ये असतांना सकाळी 06.44 वा. चे सुमारास बॅरेक क्रमांक 3 चे दक्षिण बाजुकडील 3 गज कापुन त्यातुन बाहेर येवुन लॉकअपगार्ड सुरक्षा रक्षक यांना लोखंडी गजाचा धाक दाखवुन पांढऱ्या रंगाचे कारमधुन पळुन गेले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांचे अंगावर गाडी घालुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर बाबत संगमनेर शहर पोलीस ठाणे गु. र. नं. 307, 120 (ब), 224 225, 336, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन अटक करणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे एकुण 05 पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री दिनेश आहेर यांनी सपोनि/हेमंत थोरात, पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/दत्ता हिंगडे, बापुसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, पोना/संतोष लोढे, विशाल दळवी, रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, पोकॉ/अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, चापोहेकॉ/उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांची 02 तपास पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणेकामी सुचना देवुन रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी. सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपींनी पांढरे रंगाची हुंदाई कंपनीची ऑरा (AURA) गाडी असल्याचे निष्पन्न केले. पथकाने संगमनेर शहरातील 40 ते 50 सी. सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन व गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवुन गाडीचे चालक, मालक यांचे नावं निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचे वाहन हे धुळे येथुन शिर्डीकडे येत असल्याचे लक्षात येताच त्यावरील चालक मोहनलाल नेताजी भाटी, रा. वडगांव शेरी, जि. पुणे यास शिर्डी येथुन गुन्ह्याचे वेळी वापरलेले वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता तो लॉकअपमधुन पळुन गेलेले वरील 4 आरोपी व त्यांना मदत करणारा अल्ताफ आसिफ शेख रा. कुरण ता. संगमनेर हे जेलमधुन पळाल्यानंतर धुळे येथे शांतीसागर हॉटेल येथे थांबल्यानंतर गाडी नादुरुस्त झाल्याने वरील आरोपी रस्त्याने जाणारे प्रवासी वाहनातुन जळगांवचे दिशेने गेल्याची व पुढे नेपाळकडे जाणार असल्याची माहिती दिली. सदर माहितीचे आधारे पथकाने शांतीसागर हॉटेल तसेच आजुबाजुचे हॉटेल, दुकानदार यांना आरोपीचे फोटो दाखवुन विचारपुस करता एका चहा टपरीचालकाने आरोपीचे फोटो ओळखुन टपरीचालकाचे गुगल पे वर 2000/- रुपये मागितल्याची व त्याने ते रोख दिल्याची माहिती दिली. सदर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन संबंधीत इसमाकडे विचारपुस करता त्याने वरील आरोपी हे त्याचे शेतामध्ये थांबले असलेबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शेतामध्ये जावुन आरोपीचा शोध घेतला असता 5 आरोपी ओढ्यामध्ये आंघोळ करत असतांना ताब्यात घेतले आहे.
मिळुन आलेल्या आरोपीची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये व ताब्यातुन 01 गावठी कट्टा, 01 जिवंत काडतुस, 06 मोबाईल फोन, हुंदाई कंपनीची ऑरा गाडी, असा एकुण 10,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे सखोल विचारपुस करता त्यांनी मागील 01 महिण्यापासुन व्हेक्सा ब्लेडचे सहाय्याने गज कापण्याचे काम करत असलेबाबत सांगितले आहे. आरोपींना कारागृहामध्ये गज कापण्यासाठी हत्यारे पुरविणारे तसेच त्यांना पळुन जाण्यासाठी मदत करणारे व आरोपींना आश्रय देणारे इतर इसमांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याची कार्यवाही चालु आहे.
मिळुन आलेले आरोपी 1) राहुल देविदास काळे वय 31 वर्षे, रा. वडगांव पान, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, 2) रोशन उर्फ थापा रमेश ददेल वय 25 वर्षे, रा. इंदीरानगर, 3) मच्छिंद्र मनाजी जाधव वय – 33 वर्षे, रा. घारगावं साकुर, ता. संगमनेर, 4) अनिल छबु ढोले वय – 40 वर्षे, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर, 5) अल्ताफ आसिफ शेख वय – 27 वर्षे, रा. तावडे वस्ती, पुणे, हल्ली रा. कुरण ता. संगमनेर 6) मोहनलाल नेताजी भाटी वय 47 वर्षे, रा. वडगांव शेरी, जि. पुणे यांना , संगमनेर शहर पोलीस स्टेशन, गु.र.नं. 916/2023 भादवि कलम 307, 120 (ब), 224 225, 336, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे हे करीत आहोत.

आरोपी राहुल देविदास काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुन, चोरी, दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 5 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे.
अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 संगमनेर ता. 298/2020 भादवि कलम 302, 307, 34
2 संगमनेर ता. 142/2010 भादवि कलम 379, 34
3 संगमनेर ता. 89/2020 भादवि कलम 452, 323, 504
4 संगमनेर शहर 248/2021 भादवि कलम 324, 323
5 संगमनेर ता. 15/2020 भादवि कलम 324, 323, 504

आरोपी अल्ताफ आसिफ शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर पुणे जिल्ह्यामध्ये चोरी, दुखापत, छेडछाड करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 8 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे.
अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 संगमनेर शहर 148/2013 भादवि कलम 379, 34
2 समर्थ, पुणे 100/2014 भादवि कलम 326, 34
3 एम.आय.डी.सी. भोसरी,पुणे 145/2016 भादवि कलम 326, 504, 506, 142, 144, 147
4 संगमनेर शहर 287/2018 भादवि कलम 379
5 भोसरी पुणे 549/2020 भादवि कलम 379, 34
6 संगमनेर शहर 234/2020 भादवि कलम 188, 323, 504, 506
7 संगमनेर शहर 02/2021 बा.लै.अ.प्रतिबंधक अधि. 3, 4, 5, 6
8 संगमनेर शहर 384/2021 भादवि कलम 326, 324, 323, 143, 147

आरोपी मच्छिंद्र मनाजी जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुन, मारहाण करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण – 2 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे.
अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 घारगांव 165/2022 भादवि कलम 302, 307, 326, 323
2 घारगांव 28/2014 भादवि कलम 341, 324, 323, 504

आरोपी रोशन उर्फ थापा रमेश ददेल याचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तो खालील प्रमाणे.
अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 संगमनेर शहर 419/2021 भादवि कलम 376 (अ), 376 (ब) बा.लै.अ.प्रतिबंधक अधि. कलम 6
आरोपी अनिल छबु ढोले याचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तो खालील प्रमाणे.
अ. क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 संगमनेर शहर 511/2021 भादवि कलम 376
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग संगमनेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे