देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दिनांक १० मार्च : नगर तालुका पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे तसेच खुनाच्या गुन्हा मध्ये त्यांना अशी मागणी नगर तालुक्यातील साकत येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चितळकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे. निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की दिनांक सहा तीन 2025 रोजी मयत मिठू कार्तिक दत्त यांचे व्हीआरडीई गेट जवळील कोमल फरसाणचे मालक विश्वनाथ नांगरे राहणार अरणगाव ता. जिल्हा अहिल्यानगर यांच्यासह त्याच्या साथीदारांनी संगनमताने खून केला होता. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद होऊन सदर प्रकरणाची चौकशी त्यावेळचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी स्वतःकडे घेतली होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी खुनाचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता आरोपी कडून आर्थिक लाभ घेत खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत मी स्वतः या प्रकरणात पुढाकार घेऊन तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांच्याबाबत तक्रारी अर्ज केले. नंतर सदर मृत्यूची चौकशी चौकशी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे वर्ग केली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरींनी याबाबत सर्व पुरावे गोळा करत नगर तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी मृत्यूचे चौकशीमध्ये साक्षीदार यांचे जबाब भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 183 प्रमाणे मा. न्यायालयासमोर नोंदविले आहेत. वास्तविक पाहता मी तज्ञांकडे चर्चा केली असता, अकस्मात मृत्यूच्या चौकशीमध्ये असे जबाब नोंदविले जात नाहीत. अशी माहिती मला समजली. म्हणजेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी जाणून बुजून खोटे जबाब नोंदवून गुन्हा दडपण्याची पूर्ण तयारी केली होती. याबाबत गीते यांच्या विरोधात प्रचंड तक्रारी दाखल होऊनही वर्तमानपत्रात वेळोवेळी त्यांचे कारणाने छापून येऊन देखील त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसून त्यांना वरिष्ठ स्तरावरून पाठीशी घातले जात असल्याची चर्चा नगर तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. सदर गंभीर प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करत खुनाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करावे तसेच सदर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी केली आहे. याबाबत माननीय जिल्हा न्यायाधीश अहिल्यानगर, माननीय पालकमंत्री अहिल्यानगर माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देखील सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव सादर करणार असल्याचे नमूद केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा