शहराच्या विकासासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यमंत्र्यांच्या हस्ते शहराच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

अहमदनगर दि. 8 मे (प्रतिनिधी) शहराच्या विकासासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. ढवणवस्ती तपोवन रोड. याठिकाणी आयोजित विविध विकास कामांचे उदघाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप,उपमहापौर गणेश भोसले विरोधी पक्षनेते संपतदादा बारस्कार या प्रभागातील नगर सेवक आदीमान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री श्री भरणे म्हणाले, शहरात होऊ घातलेल्या विविध विकास कामांसाठी, मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा असून कामांच्या मंजुरी संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करील असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी आपल्या मनोगतात शहरात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली आणि भविष्यातही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून मंजूर असलेल्या शहरातील विविध विकास कामां मध्ये, केडगाव देवी रस्त्यावरील पुलाच्या कामाचे,केडगाव अरणगाव रस्ता उद्घाटन, अनुसया नगर येथे उद्यान व जॉगिंग ट्रॅक कामाचे भूमिपूजन भिस्तबाग महाल ते कॉटेज कॉर्नर रस्ता , वडगाव गुप्ता रस्ता, ढवण वस्ती परिसरातील पाणी योजना, शिवनगर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, गांधीनगर लिंगेश्वर महादेव मंदिर सभामंडप बोल्हेगाव गावठाण मारुती मंदिर सभामंडपाचे उद्घाटन आणि बोल्हेगाव गावठाण येथील भुयारी गटार योजनेचे लोकार्पण राज्यमंत्री श्री भरणे त्यांच्या हस्ते आज करण्यात आले.कार्यक्रमाला नगर सेवक डॉ सागर बोरुडे, मीनाताई चव्हाण, दिपालीताई बारस्कार, मनोज कोतकर ,गणेश नन्नवरे ,विष्णू म्हस्के ,बजरंग भुतारे आदी उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.