कौतुकास्पद
जिल्हा रुग्णालयात रुग्णांना बिस्किटपुडे वाटत वाढदिवस साजरा! जितेंद्र आव्हाड युवा मंचचा सामाजिक उपक्रम!

अहमदनगर दि.२१ जून (प्रतिनिधी) जितेंद्र आव्हाड युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष ॲड.प्रमोद सरोदे यांचा वाढदिवस जितेंद्र आव्हाड युवा मंच अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने येथील जिल्हा रुग्णालयात सामजिक जाणिवेतून महिला वॉर्डातील महिला रुग्णांना बिस्किटपुडे वाटत नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी
देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संस्थापक संपादक तथा जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हा सरचिटणीस महेश भोसले,सामजिक कार्यकर्ते संजूभाऊ ताकवाले, जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,सुनीता धनवटे, मीरा गवळी,राणी सोनार,राणी शेलार,राधा पाटोळे,रेखा डोळस,मनीषा खंडागळे,जावेद कुरेशी, बाळासाहेब ढवळे ,रौफ कुरेशी, आदी कार्यकर्ते व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.