महागाई, बेरोजगारीच्या विळख्यातून आज काँग्रेसच देशाला वाचवू शकते – माजी मंत्री आ. सतेज पाटील शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले पाटील यांचे शहरात स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी) : देशात आज महागाईचा आगडोंब उसळला आहे. सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. महिलांचे बजेट कोलमडले आहे. बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्याच्या विळख्यात सापडली आहे. या विळख्यातून देशाला बाहेर काढण्याची ताकद ही केवळ काँग्रेसमध्येच आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, काँग्रेस नेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले आहे.
आ. पाटील हे नगर शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आ.पाटील यांचे यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत केले.
आ.पाटील म्हणाले की, खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. दक्षिणेतून यात्रेसाठी निघालेल्या खा. गांधी यांना मिळणारा सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. यात्रा महाराष्ट्रात लवकरच पोहोचेल. त्याची जय्यत तयारी राज्यात सुरू आहे. नगर शहरातून देखील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना आ. पाटील यांनी केले.
किरण काळे म्हणाले की, काँग्रेसची संघटनात्मक बांधणी शहरात चांगल्या पद्धतीने चालू आहे. माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आगामी मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधींना आ. थोरात यांच्या हस्ते शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगरच्या ऐतिहासिक मातीचा कलश दिला जाणार आहे. देश जोडत असताना शहरात देखील लोकांना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी मोठ्या संख्येने जोडण्याचे काम सुरू आहे.
यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण गीते, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, माजी नगरसेवक फैयाज शेख, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष राणीताई पंडित, पुनम वंनम, ज्योतीताई साठे, मोमीन मिनाज, अर्चना पाटोळे, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, सरचिटणीस इमरान बागवान, पै. दीपक बापू जपकर, प्रशांत जाधव, सुफियान रंगरेज, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, आकाश आल्हाट, मोहनराव वाखुरे, उमेशदादा साठे, गौरव कसबे हरीश पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.