सामाजिक
“लय मजबूत भीमाचा किल्ला” चे गायक, संगीतकार येवले बंधू यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम १३ एप्रिल रोजी माळीवाडा येथे होणार: रोहित बंडूभाऊ आव्हाड

- अहमदनगर दि. ९ एप्रिल (प्रतिनिधी)
महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या संयुक्त जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A पक्षाकडून “तुम्ही कितीबी लावा शक्ती आणि कितीबी लढवा युक्ती तुम्ही करा रे कितीही हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला” या गाण्याचे गायक संगीतकार वादक येवले बंधू यांचा भीम गीतांचा जंगी कार्यक्रम पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे व नगरचे तरुण तडफदार युवकांचे नेतृत्व कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन 13 एप्रिल ला सायंकाळी सहा वाजता माळीवाडा जिल्हा परिषद ऑफिस समोर एसटी स्टँड रोड माळीवाडा अहमदनगर येथे आयोजित केले आहे.अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित बंडूभाऊ आव्हाड यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व टीम आणि वर्ल्ड किंग ग्रुपचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत तरी सर्व भीमसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने करण्यात आले आहे.