पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडी,आर पी आय आंबेडकर ,तथागत बुधिस्ट सोसायटी यांचा अ’नगर भाजप कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर दि.१२ डिसेंबर (प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडी सह आर पी आय आंबेडकर गट,तथागत बुधिस्ट सोसायटी,युवा आघाडी,महिला आघाडी या सर्व समविचारी संघटना पक्षांनी भारतरत्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करत, भाजप नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी यांनी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.आज अहमदनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, आर पी आय आंबेडकर गटाचे संपर्क प्रमुख रोहित आव्हाड,तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव योगेश साठे,भिंगार अध्यक्ष जे.डी.शिरसाठ,शहर जिल्हा सचिव भाऊ साळवे,युवा अध्यक्ष संदीप वाघमारे,अमर निरभवणे,फिरोज पठाण,बबलू भिंगारदिवे, आकाश डागवाले,माथाडी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुनील भिंगारदिवे,वाकोडी ग्रामपंचायत सदस्य जिल्हा महासचिव शैनेश्वर पवार सह युवा कार्यकर्ते,महिला आघाडी स्तुती साळवे सह अन्य महिला कार्यकर्त्या यांनी आक्रमक भूमिका घेऊन शनिवारी गांधी मैदान येथे असलेल्या अहमदनगर भाजप कार्यालयासमोरच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता भाजप कार्यकर्ते कार्यालयाला कुलूप लावून पळून गेले होते.त्यानंतरच चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अन्यथा नगर जिल्ह्यात त्यांना फिरू देणार नाही तसेच त्यांना काळे फसू. यापुढे कोणत्या आमचे आदर्श महापुरुषांची बदनामी कारक वक्तव्य कृत्य खपून घेतली जाणार नाही जश्यास तसे उत्तर दिल्या जाईल असे वंचित बहुजन आघाडी सह सर्व समविचारी संघटना पक्ष यांनी सज्जड इशारा देण्यात आला.यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्याप्रमाणत तैनात करण्यात आला होता.