कौतुकास्पदप्रशासकिय

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट ने केला विश्वविक्रम संस्थेला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार जाहीर!

अहमदनगर दि.२ डिसेंबर (प्रतिनिधी)
नागेबाबा मल्टीस्टेट ने २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण देशभरातील ५७ शाखाव्दारे ६ लाखापेक्षा अधिक ग्राहकांना वर्षाचे ३६५ दिवस दररोज १२ तास सेवा देवून नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे. या कामकाजाची दखल “वर्ल्ड रेकाँर्ड इंडीया ” या ऑर्गनायझेशन ने घेतली असून संस्थेला ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे प्रसिद्ध युवा हृदय सम्राट ह.भ . प. समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते, ह.भ. प. केशव महाराज उखळीकर यांच्या अध्यक्षतेखाली व वर्ल्ड रेकाँर्डचे अध्यक्ष पवनकुमार सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत व आपल्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ सप्टेंबर २००९ रोजी स्थापन झालेल्या संस्थेने अल्पावधीत देशभरात ५७ शाखा स्थापन करुन शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरीक व महिला असे ६ लाखापेक्षा अधिक ग्राहक जोडले आहेत. मल्टिस्टेटच्या सर्व शाखांमध्ये वर्षभरातील एकही दिवस सुट्टी न घेता सर्व ३६५ दिवस सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात कामकाज सुरु असते. त्याचा फायदा संस्थेच्या ग्राहकांना व्यावसायिक वृध्दीसाठी व आर्थिक चलन वलनासाठी तसेच सुरक्षेसाठी झाला. अशा प्रकारे संस्थेने दररोज १२ तास काम करून एका वर्षात ४३८० तास ग्राहक सेवा देणारी बँकिंग क्षेत्रातील एकमेव संस्था ठरल्याने तसेच मागील १३ वर्षात ५७००० तास ग्राहकसेवा देऊन नागेबाबा मल्टिस्टेटने विश्वविक्रम रचला आहे त्याची दखल ” वर्ल्ड रेकाँर्ड इंडीया” या ऑर्गनायझेशन मार्फत घेण्यात आली आहे. ता.६ रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहात याबाबतचे प्रमाणपत्र हे अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा देणारे पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी यांना वितरीत करण्यात येणार आहे.
विनम्रता व सचोटीने ग्राहकाभिमुख सेवा देणा-या सर्व शाखांमधील अधिकारी, कर्मचारी , ग्राहक व पदाधिकारी या नागेबाबा परिवारातील सदस्यांमुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरील हा विक्रम स्थापित करता आला याचे समाधान आहे. त्या बरोबरच *’अधिक चांगल्या पध्दतीने सेवा देण्याची जबाबदारी देखील वाढली आहे’* असे संत नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे व सर्व संचालक यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे