नगर औरंगाबाद रस्त्यावर पांढरी पुलाजवळ महामार्गालगतच अनधिकृत हॉटेलचे बांधकाम असल्याने तहसीलदार यानी दिले कारवाईचे आदेश!

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर औरंगाबाद रोडवरील पांढरी पुल येथील हॉटेल लिलियम पार्क हे महामार्गाच्या नियमाचे उल्लंघन करत असून. महामार्गावर अनधिकृत बांधकाम केले असल्याने ते बांधकाम त्वरित काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाना पाटोळे यांनी केली होती. सदर हॉटेल लिलीयम पार्क रेस्टॉरंट ची प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी घेतलेली आहे किंवा कसे याबाबत विचारणा केली होती या संदर्भात कार्यालयीन अभिलेखाल शोध घेतला असता सदर जागेवर या कार्यालयाने बांधकाम परवानगी स्थळ शिफारस केलेली कागदपत्रे कार्यालयास आढळून येत नाही तथापि याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित जमीन मालक यांना मंजूर बांधकाम परवानगी चे कागदपत्रे सादर करणे बाबत पत्र देऊन आपले स्तरावर शहानिशा करण्याचे पत्र नगर रचना विभागाने दिलेले होते. अहमदनगर तहसीलदार यांनी पत्र दिले आहे की मंडळ अधिकारी जेऊर यांच्याकडील अहवालानुसार मौजे खोसपुरी ता अहमदनगर येथील गट नं.105/1/1 क्षेत्र 6700 चौ.मी. व गट नं.105/3 चे क्षेत्र 7800 चौ. मी.व गट.नं.105/6 चे क्षेत्र 8900 चौ.मी असे एकूण क्षेत्र 23400 चौ.मी यावर रेस्टॉरंट व हॉटेल (वाणिज्य) या प्रयोजनासाठी इकडील बिनशेती आदेश क्र. कावी/ जमीन/ एनएएएसआर /9/2018 दी.14 जानेवारी 2018 आदेश पारित केलेला आहे. तहसीलदार यांनी याप्रकरणी हॉटेल असे अनधिकृत बांधकाम केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली असून त्यानुसार चौकशी अहवाल मागवण्यात आलेला आहे प्रस्तुत प्रकरणी सदर ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केले असता सदर इसम यांनी हॉटेलच्या जागेवर बांधकाम केलेले आहे प्रकरणी अर्जदार यांनी परवानगी पूर्वक बांधकाम केले असल्याने प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील आदेश व जिल्हाधिकारी यांच्याकडील ज्ञापन आपण चालू वर्षाचे दराने अस्तित्वातील बांधकामाची किंमत काढून कळवावे सदर बाब वसुलीशी निगडित असल्याने व प्रकरणी शासनास आपण नमूद केलेल्या किमतीचे दहा टक्के तळजोड शुल्क मिळणार असल्याने त्वरित कारवाई करावी असे लेखी पत्र काढण्यात आलेले आहे.