एस टी महामंडळाचे वाहक दौलत पिंपळे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त!

अहमदनगर दि.६ जून (प्रतिनिधी) एस टी महामंडळाचे वाहक श्री दौलत विनायक पिंपळे हे एस. टी. महामंडळात वाहक पदावर कार्यरत होते.३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते ३१ मे २०२२ रोजी
सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृती निम्मित त्यांचा
अहमद्नगर विभागाचे विभाग नियंत्रक श्री गिते साहेब,तारकपूर आगार प्रमुख श्री आघाव् साहेब व कामगार संघटनेचे सचिव,श्री अरुण दळवी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमुर्ती दौलत पिंपळे यांनी सर्व कामगार व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच राळेगण गावचे ग्रामदैवत म्हसोंबा महाराज भव्य मंदिरामध्ये सत्कार करण्यात आला.यावेळी बांधकाम समितीचे माजी सभापती श्री. बाळासाहेब हराळ,Dysp श्री.शाहू राजे साळवे,सिने अभिनेतेश्री. प्रकाश धोत्रे,
श्री.विकास डावखरे,श्री .कैलास खोकराळे, श्री.विजू डावखरे,मार्केट कमीटीचे माजी चेअरमनश्री. अभिलाश् घिगे व राळेगन गावचे श्री.उपसरपंच सुधीर भापकर आदी उपस्थित होते.