पत्रकार कुरुमकर यांनी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच प्राधान्य दिले -केंद्रप्रमुख जावेद सय्यद

लिंपणगाव (प्रतिनिधी) ज्येष्ठ पत्रकार व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व नंदकुमार कुरुमकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन, शिक्षकवृंद राबवत असलेल्या शालेय उपक्रमांना नेहमीच प्रसिद्धीच्या माध्यमातून प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला, असे गौरवउद्गार मढेवडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख जावेद सय्यद यांनी काढले.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी मढेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी कुरुमकर यांचा केंद्रप्रमुख जावेद सय्यद यांनी सन्मान केला. शाळा अंतर्गत राबवलेल्या उपक्रमाची मुख्याध्यापक जावेद सय्यद यांनी पत्रकार कुरुमकर यांना सविस्तर माहिती दिली. मढेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राबवत असलेल्या उपक्रमाची पत्रकार कुरुमकर यांनी प्रशंसा केली.
यावेळी केंद्रप्रमुख जावेद सय्यद यांनी यावेळी पत्रकार कुरुमकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून शिक्षण, सहकार, कृषी, सिंचन क्षेत्रातील बातम्यांना अग्रेसक्रमाने प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन क्षेत्रात शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांना योग्य वेळी प्रसिद्धी देऊन शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत मिळत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून श्री सय्यद पुढे म्हणाले की, मुळातच कुरुमकर हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने त्यांना शिक्षण क्षेत्राची जाणीव आहे. एक निर्भीड व शिस्तप्रिय पत्रकार म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. असे सांगून केंद्रप्रमुख सय्यद यांनी त्यांच्या पत्रकारिता कार्याला सलाम दिला आहे.
यावेळी मढेवडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका सीमा खिळे, सुवर्णा बारस्कर, ढवळे सुनीता आदी उपस्थित होत्या.