समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आजमी यांनी घेतली कापड बाजार येथील हातगाडी धारकांची दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन.
हातगाडी धारकांना बाजारात हॉकर्स झोन करून देण्याची मागणी.

अहमदनगर दि.२५(प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांना समाजवादी चे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी कापड बाजार येथील ऐका व्यापारीने त्याच्या दुकाणा समोरील हातगाडी धारकाशी आपसात भांडण झाले. त्या भांडणाला राजकीय वळण लागून तेथील सर्व हातगाडी धारकांना धारेवर धरले असल्याची माहिती दिली असता. अबू असीम आझमी यांनी कापड बाजार येथील गोरगरीब हातगाडी धारक यांना व्यवसाय करण्यासाठी अडचण निर्माण होत असुन तेथे सुरळीत व्यवसाय चालू राहण्यासाठी व तेथें कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले. व कापड बाजार येथे हातगाड्यांवर व्यापार करणाऱ्यांवर काही स्थानिक नागरिक त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे सर्व हातगाड्या धारकांना धारेवर धरून विनाकारण खोटी तक्रार दाखल करून सर्व हातगाड्या धारकांना बाजारातून काढण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न चालू असून हे सर्व हातगाड्या धारक अनेक वर्षापासून तेथे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे हातगाडी धारक यांना नेहमीप्रमाणे बाजार तळ फेरीवाल्यांना हॉकर्स झोन करून देण्यात यावे. व काही दिवसानंतर मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे. अशा वेळेस फेरीवाल्यांना त्रास न देता त्यांना तेथे व्यवसाय करून देण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.