सामाजिक

बोल्हेगाव परिसरात थोड्याच काळात सेकंड होते सहज स्कुलने नावलौकिक केले- डॉ. सागर बोरुडे

अहमदनगर दि.१० एप्रिल (प्रतिनिधी) – प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल च्या वतीने बोल्हेगाव परिसरातील लहान मुलासाठी मोफत सर्व रोग निदान शिबीर व औषधं वाटप कार्यक्रम चे उदघाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना नगरसेवक व महानगरपालिका आरोग्य समिती चे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे म्हणाले साध्यच्या काळात आरोग्य उपचार पद्धती महागडी झाली असून गोरगरिबांना न परवडणारी आहे. अशा परिस्थिती मध्ये आरोग्य शिबीर व मोफत औषधं वाटप करणे ही काळाची गरज असून फार थोडया काळात किड्स सेकण्ड होम स्कुल ने बोल्हेगाव परिसरात आपले नावलौकिक केले असून स्कुल च्या भावी कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.या वेळेस या भागातील नगरसेवक मदन आढाव, ऍड राजेश कातोरे व युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळे बाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. सागर बोरुडे होते तर प्रमुख पाहुणे मा.श्री. मदनशेठ आढाव (नगरसेवक), मा.श्री. ऍड. राजेश कतोरे (नगरसेवक) , मा.श्री. आकाश कतोरे (युवासेना जिल्हा अध्यक्ष) तसेच अनुभवी डॉक्टर सौ. वर्षा मगर, डॉ. दत्तात्रय भोंडवे व डॉ.सारिका भोडवे यांनी सर्व रोग निदान शिबीर घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपाली हजारे मॅडम यांनी केले तर पाहुण्याची ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका दीपिका कदम यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे खजिनदार श्री. संदिप गांगर्डे यांनी केले कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगांवकर , शाळेच्या शिक्षिका सौ. संगीता गांगर्डे, सौ. रुपाली जोशी, वैष्णवी नजन, आचल नेटके, राणी उगले आणि सर्व शाळेचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सदर शिबिराचा या भागातील नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे