माळीवाडा बस स्टँड येथे चालणारा अवैद्य धंदा बंद करा: ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन!आठ दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा!

अहमदनगर दि. १६ डिसेंबर (प्रतिनिधी) अहमदनगर शहरातील प्रमुख चौका पैकी माळीवाडा बस स्टँड येथे पार्सल गेट लगतच अनेक दिवसांपासून अवैद्य धंदा म्हणजेच मटका राजरोसपणे चालू आहे.याबाबतऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन अवैद्य धंदा बंद करण्याचे निवेदन दिले आहे.
राजरोस पणे उघड्यावर मटका चालविण्याची हिम्मतच कशी होते? त्यांना शासनाची व प्रशासनाची भीती आहे का नाही? की प्रशासनच प्रशासनच सदर अवैद्य धंदे करणाऱ्या व्यक्तीवर मेहरबान आहे का? असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
अशा प्रकारचे अवैध्य धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे. सदर व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. येत्या आठ दिवसात कारवाई नाही झाली तर ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.