जागतिक महिलादिना निमित्त डॉ.अनभूले मेडिकल फोंडेशन व लायन्स मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्रीरोग निदान व उपचार शिबिर

अहमदनगर दि. ७ मार्च (प्रतिनिधी )-लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन तसेच डॉ. अनभुले हॉस्पिटल व डॉ. अनभुले मेडिकल फोंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोग निदान व उपचार शिबिराचे नियोजन केले असल्याचे माहिती लायन्स मिडटावून चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व अनभुले हॉस्पिटल चे संचालक डॉ.दीपाली अनभुले यांनी दिली.
डॉ. दीपाली अनभुले यांनी शिबिरात महिलांच्या गर्भाशयातील गाठी, स्तनांच्या गाठी, मासिक पाळीच्या तक्रारी,अंग बाहेर येणे, पांढरे पाणी जाणे/ श्वेतपदर त्रास,गर्भधारनेस विलंब, वारंवार गर्भपात व ओटीपोट दुखणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,केन्सर निदान व उपचार, दुर्बिणीव्दारे गर्भपिशवी काढणे,इत्यादी विकारांच्या तपासण्या व उपचारांचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सदर शिबिर हे खास महिलादिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनने आयोजित केले असल्याचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी सांगितले या शिबिराचा लाभ सर्व महिलांनी जास्तीतजास्त प्रमाणात घ्यावा असे आवाहन ही बोज्जा यांनी केले आहे.
बुधवार दि.8 मार्च रोजी डॉ. अनभुले हॉस्पिटल प्रेमराज चौक,सावेडी येथे सकाळी 9 ते 2च्या दरम्यान सदर शिबीर आयोजित होणार आहे.
या महिलादिनानिमित्त जेष्ठ साहित्यिका कवियत्री,मा. नगरसेविका व अंबिका महिला बॅंकेच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती क्रांतिकला अनभुले यांचा लायन्स क्लब मिडटाउन्स च्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याचे संस्थापक, अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी सांगितले