तेरा लाख रुपयांचे गोमांस स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त!

अहमदनगर दि. ११ मार्च (प्रतिनिधी) तेरा लाख रुपये किमतीचे गोमांस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईची अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार, पोहेकॉ/संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, पोकॉ/विजय धनेधर, कमलेश पाथरुट अशांना त्यांच्या दालनात बोलावुन घेवुन कळविले की, आताच गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तौफीक युनूस कुरेशी रा. अहमदनगर हा त्याच्या हस्तकामार्फत आयशर टॅम्पोमध्ये गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याच्या उद्देशाने नगर-औरंगाबाद रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अकबर नगरच्या समोर ए.बी. फॅब्रीकेशनच्या समोर उभा आहे. तरी माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.
त्यानंतर वरील पोलीस स्टाफ व दोन पंच असे वाहनाने निघून बातमी प्रमाणे सदर वाहनास पकडण्या करीता नगर-औरंगाबाद रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अकबर नगरच्या समोर ए.बी. फब्रीकेशनच्या समोर जावून खात्री केली असता त्याठिकाणी वरील वर्णणाचा लाल रंगाची आयशर गाडी नं. एम.एच./04/जेयु 2101 ही उभी असताना दिसली आमची व पंचाची खात्री पटताच अचानक छापा टाकून सदर आयशरवरील ड्रायव्हर सिटवर बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्यास आमची व पंचाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मुझफर आयुब शेख वय 32 वर्षे रा. खडकत ता. आष्टी जिल्हा बीड असे सांगितले. सदर आयशर टॅम्पोच्या पाठीमगील हौदाची पाहणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जातीचे जनावरांचे गोमांस हे बर्फामध्ये दिसले. सदर चालकास गोमांसाबाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमांस हे इसम नामे 2) तौफीक युनुस कुरेशी रा.व्यापारी मोहल्ला सुभेदार वस्ती, अहमदनगर यांचे मालकीचे असल्याचे त्याने सांगीतले.
सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात 6,00,000/- किमंतीचे अंदाजे 4000 किलो अर्धवट कापलेले गोमांस व वाहतुकीसाठी वापरेला एक 7,00,000/- रुपये कि.ची लाल रंगाचा आयशर टॅम्पो अस एकुण 13,00,000/- किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बाबत पोकॉ/2503 कमलेश हरिदास पाथरुट नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर याचे फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन 151/2023 प्रमाणे भादवी कलम 269,34 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील कायदेशिर कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे मुझफर आयुब शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द महाराष्ट्र पशुसंवर्धन अन्वये ü एकुण -05 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. मुंद्रुप, जिल्हा सोलापूर 186/2018 भादवी कलम 429, 269,270
2. मुंद्रुप, जिल्हा सोलापूर 236/2019 भादवीक 429,269,270, 34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), (ड) प्रमाणे
3. कर्जत 390/2020 भादवीक 429, 269, 270, म.प्रा.सं.का.क.5 (अ) (1) (ब) 9 प्रमाणे
4. जामखेड 485/2021 भादवीक 429,269,270,34 सह म.प्रा.सं.का.क.5(क),9(अ) प्रमाणे
5. भिंगार कॅम्प 151/2023 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
आरोपी नामे तौफिक युनूस कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द महाराष्ट्र पशुसंवर्धन अन्वये ü एकुण -07 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 10/2018 म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
2. कोतवाली 130/2018 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
3. कोतवाली 453/2021 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
4. कोतवाली 313/2021 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
5. कोतवाली 80/2022 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
6. जामखेड 555/2022 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
7. भिंगार कॅम्प 151/2023 भादवी कलम 269,34 सह म.प्रा.सं.का.क.5 (क), 9 (अ) प्रमाणे
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.