विकासातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम नागरिकांना बरोबर घेत काँग्रेस करणार – किरण काळे 📍 आजादी अमृत महोत्सव वर्षानिमित्त काँग्रेसचा प्रभाग क्र. २, ४, ५ मधील नागरिकांशी संवाद

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगरनंतर मागून येत औरंगाबाद, नाशिकचा विकास झाला. त्या छोट्या शहरांची महानगरं झाली. अहमदनगरची महानगरपालिका ही केवळ कागदावरच महानगरपालिका असून नगर शहराची अवस्था ही खेड्यापेक्षाही वाईट झाली आहे. मात्र नागरिकांना बरोबर घेत विकासातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे व्हीजन केवळ काँग्रेस पक्षाकडे असल्याचे, प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आजादी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरामध्ये पदयात्रा व संवाद कार्यक्रमांचे दररोज आयोजन करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक २,४,५ मधील नागरिकांशी या निमित्ताने जिल्हाध्यक्ष काळे यांनी संवाद साधला. सावेडी उपनगरातील काँग्रेसचे पदाधिकारी अभिनय गायकवाड यांच्या पुढाकारातून या तीनही प्रभागांचा एकत्रित संवाद कार्यक्रम प्रभाग २ मध्ये पार पडला. त्यावेळी काळे बोलत होते.
किरण काळे म्हणाले की, विकास पुरुष नवनीतभाई बार्शीकर यांनी शहरासाठी मोठे योगदान दिले. मात्र मागील तीन ते चार दशकांपासून शहराच्या विकासासाठीचे व्हिजन असणारे नेतृत्व दुर्दैवाने शहराला न लाभल्यामुळे शहर बकाल झाले आहे. एमआयडीसीमध्ये कोणती ही मोठी कंपनी आज येण्यास तयार नाही. चुकीचा राजकारण्यांच्या हाती या शहराची सत्तेची दोरी गेल्यामुळे शहराची मलीन झालेली प्रतिमा यासाठी कारणीभूत आहे. मात्र यामुळे शहराचे नुकसान झाले असून ही प्रतिमा सुधारण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे.
अभिनय गायकवाड प्रभाग क्र. २ मधील काँग्रेसचे धडाडीचे नेतृत्व आहेत. त्यांना सर्वसामान्य माणसाविषयी आत्मीयता आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो. प्रभाग २ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या प्रभागात काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग स्तरावर काँग्रेसची आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून केवळ पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्यांनाच उमेदवारीची संधी दिली जाणार आहे. अभिनय गायकवाड यांच्यावर लवकरच महत्वपूर्ण जबाबदारी सोपवून त्यांना या प्रभागात अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी बळ देण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल, असे म्हणत काळे यांनी गायकवाड यांच्या कामाचे यावेळी भरभरून कौतुक केले.
यावेळी नागरिकांनी प्रभागातील विविध समस्या मांडल्या. शहर विकासाच्या दृष्टीने विविध संकल्पना त्यांनी व्यक्त केल्या. संदीप माने, मनोज वाळके, गणेश बारगजे, राज इनामदार, राहुल साळवे, राजू डाके, स्वप्निल सातव, संदीप जाधव, राहुल साळवे, ऋतिक जाधव, सिद्धार्थ भालेराव, गणेश बुटला, उमेश साठे, अभिजीत लोखंडे, गौरव कसबे, राम तिवारी, प्रतीक ढवळे, रोहित बेल्हेकर, गौरव भोसले, ओंकार क्षीरसागर, संकेत गायकवाड, भूषण गाडवे, संकेत काळे, गणेश शिंदे, अरविंद टेम्भूरकर, अरुण कांबळे, रमेश लोखंडे, जाधव मामा, सतीश गायकवाड, नंदू भोई, संदीप माने, इंजि. सुजित क्षेत्रे, रमेश पुरी, नितीन जगताप, सुभाष पवार, सुनील अळकुटे आदींसह नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.