ब्रेकिंग

वरुर घटनेतील आरोपींना दहा दिवसात अटक करणार: सुदर्शन मुंढे

शेवगाव दि.२५ (प्रतिनिधी)
दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी शेवगाव तालुक्यातील, वरुर या गावी गोरख मारुती तेलोरे व त्यांच्या कुटुंबीयांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करणा-या गुन्हेगारांवर ॲक्ट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल होऊन महिन्यानंतर सुध्दा आरोपी सापडत नसल्याने लोकशाही मार्गाने आज
शुक्रवार दि. २५ मार्च रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने शेवगाव येथे आयोजित ठिय्या आंदोलन प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुदर्शन मुंढे यांनी महासंघाच्या शिष्टमंडळास वरिल आश्वासनाचे लेखी पत्र दिले.
यावेळी महासंघाचे उत्तरमहाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली, पिडीत कुटुंबीयांसह राज्य सदस्य संभाजी आहेर, युवक राज्य सदस्य कैलास गांगर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब केदारे, जिल्हा सचिव संतोष त्रिंबके, युवक जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, शहर उपाध्यक्ष अभिनव सूर्यवंशी, शहर सचिव महेश आहेर, आदींच्या प्रमुख उपस्थितीत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग, शेवगाव यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन झाले, प्रशासन आणि शिष्टमंडळात सकारात्मक चर्चा होऊन महासंघाला प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले.
शेवगाव तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विष्णु पाठे, शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ कवडे आणि युवकाध्यक्ष महेश शेवाळे यांनी नियोजन केलेल्या सदरील आंदोलनात आर पी आय जिल्हा संघटक आठवले गटाचे सुरेश भागवत महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश हनवते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब पाचरणे, हौसाबाई तेलोरे, सोमनाथ तेलोरे, बाबासाहेब तेलोरे, हिरालाल परदेशी, देवमन बांगरे, हरिष बन्सवाल, प्रशांत तरटे, धनसिंग डांगे, अक्षय जायगुडे, रोहिदास डांगे, हिरालाल तरटे, रोहिदास भागवत, तुषार बन्सवाल, नविन कवडे, शांतीलाल डांगे, सुनील डांगे, किशोर गरंडवाल, भारत रमंडवाल, राजू डांगे, अभिजीत बन्सवाल, सोनू तरटे, शिवलिंग सोनटक्के, रविंद्र हनवते, शुभम बन्सवाल, संजय बांगरे, अशोक तरटे, किसन डांगे, शुभम सोनटक्के, प्रवीण बनसोडे, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव भगिनी बहुसंख्येने उपस्थित उपस्थित होते.

**** सदरील घटनेला दीड महिना होऊनही पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नसल्याबद्दल समाजामध्ये प्रशासनाच्या बाबतीत मोठी चीड निर्माण झाली असून प्रशासनाने आरोपींना त्वरित अटक करून समाजाला न्याय द्यावा नसता सदरील घटनेचे पडसाद पूर्ण राज्यभर उमटतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.

दादासाहेब पाचरणे
जिल्हाकार्याध्यक्ष स्वाभिमानी
शेतकरी संघटना अहमदनगर दक्षिण

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे