सामाजिक

छत्रपती संभाजी राजे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर कर्जत सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण मागे

कर्जत (प्रतिनिधी ): दि २८
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले होते. राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व मागण्या मान्य करत उपोषण स्थगित करावे अशी विनंती केली त्यास छत्रपती संभाजी महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले उपोषण मागे घेतले. याचा कर्जत सकल मराठा समाज यांनी जल्लोष करत कालपासून सुरू असलेले मराठा सेवकांचे साखळी उपोषण स्थगित केले. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज कर्जतच्या मराठा सेवकांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणास पाठींबा देत साखळी उपोषण सुरू केले होते.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. यास कर्जत येथील सकल मराठा समाजाने पाठींबा देत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार संध्याकाळपासूनच साखळी उपोषण सुरू केले होते. यात अनेक मराठा सेवक सहभागी झाले होते. सोमवार, दि २८ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या उपोषणाची दखल घेत त्यांच्या मागण्या केल्या. तसेच त्यांना आपले सुरू असलेले उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यास छत्रपती संभाजी महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले उपोषण स्थगित केले. याचा कर्जत सकल मराठा समाजाने जल्लोष करत आपले कालपासून सुरू असलेले साखळी उपोषण देखील मागे घेतले. यासह उद्या मंगळवार, दि १ मार्च रोजीचा “कर्जत बंद” देखील स्थगित केला असल्याची माहिती डॉ नितीन तोरडमल यांनी पत्रकारांना दिली. यावेळी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषणा देण्यात आल्या.

******* राज्यपाल कोशारी यांच्या पुतळ्यास जोडे मारत त्याचे दहन
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास माहीत नसताना आपल्या अकलेचे कांदे तोडणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध म्हणून सोमवार, दि २८ रोजी कर्जत सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यपाल कोशारी यांच्या पुतळ्यास जोडे मारत दहन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमीनी भगतसिंह कोशारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तमाम शिवप्रेमीची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे