जिल्हाशल्यचिकित्सक डाँ. संजय घोगरे यांना निवेदन व सत्कार

–
अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नव्याने नियुक्त झालेले डॉ.श्री संजय घोगरे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हा अध्यक्ष सत्नाकर ठाणगे यांनी यांची सदिच्छा भेट घेतली . त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे , जिल्हा उपाध्यक्ष शेखर बोत्रे , शहर उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे , जिल्हा कार्याध्यक्ष बाबा शेख , तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जमदाडे ,कार्यालय अधिक्षक संजय ठोंबरे हे देखील यावेळी उपस्थित होते. जिल्हा रूग्नांलयातील अपंगाच्या सर्व समस्या सोडविल्या जातील . तसेच जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात जे दिव्यांगांचे शिबिर आयोजीत केले होते . त्या शिबीरामधील जे पात्र दिव्यांग आहेत त्यांच्या प्रमाणपत्रांचे लवकरात लवकर वाटप करण्यात येईल . अशा प्रकारची ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली .