अहिल्यानगर दि. 4 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पुन्हा एकदा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
दरम्यान आमदार जगताप यांनी मतदारसंघात विकास यात्रेचे आयोजन केले आहे. ही नगर विकासयात्रा रोज एका परिसरात जाते. तिथे विद्यमान आमदार नागरिकांशी संवाद साधतात.
महत्त्वाचे म्हणजे या विकास यात्रेला मतदारसंघातील नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद प्रथम पसंती मिळत आहे. पुरुष असो की महिला सारेजण या विकास यात्रेत सहभागी होत आमदार जगताप यांना आशीर्वाद देत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा