ब्रेकिंग

अवैध वाळू उपशावर शेवगाव तालुक्यातील बोधेगाव-गेवराई रोडवर सुकळी फाटा येथे स्थानिक शाखेच्या पथकाची कारवाई! पंधरा लाख साठ हजार किमतीच्या मुद्देमालासह एक आरोपी अटक!

अहमदनगर दि. ४ जानेवारी (प्रतिनिधी )

शेवगांव पोस्टे हददीत फरार व पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. शेवगांव पोस्टे हद्दीमध्ये बोधेगाव ते गेवराई रोडने एक पिवळया राखाडी रंगाचा बिना नंबरचा हायवा वाळु भरुन चोरुन बोधेगावच्या दिशेने येत आहे. सुकळी फाटा येथे जावून सापळा लावल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल/ विजयकुमार बाळासाहेब वेठेकर, पोना/ लक्ष्मण चिंधु खोकले,पोकॉ/ रंजीत पोपट जाधव, पोना/शंकर संपत चौधरी,पोना /रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोकॉ/ कमलेश हरिदास पाथरुट,पोकॉ/ शिवाजी अशोक ढाकणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वरील कर्मचाऱ्यांनी
शेवगांव पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने निघुन बातमीतील नमुद ठिकाणी बोधेगाव ते गेवराई रोडवर सुकळी फाटा येथे येथे जावुन सापळा लावुन थांबलो असता थोडया वेळाने नमुद बातमी प्रमाणे एक पिवळया व राखाडी रंगाचा दहा चाकी हायवा बोधेगावच्या दिशेना येताना दिसला आमची खात्री होताच सदर ठिकाणी ०८/३० वा सुमारास सदर हायवा वरील ड्रायव्हर यास थांबवण्याचा इशारा केला असता हायवा वरील चालकाने हायवा रोडच्या कडेला थांबवला असता हायवा वरील चालकास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव शब्बीर बादशाह शेख वय रा. लाडजळगांव ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले व सदर हायवाच्या मालकाबाबत पकडलेल्या इसमास विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी स्वतःह हायवाचा चालक व मालक आहे असे असल्याचे सांगितले वरील वाहनांवरील चालक याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे. सदर पकडलेल्या वाहनांची दोन पंचासमक्ष पाहणी करता त्याचे वर्णन
१) १५,००,०००/- रु कि. चा एक विनानंबरचा २५२८ मॉडेलचा कॅबिन पिवळया रंगाची व हौदा राखाडी रंगाचा भारत बेंज कंपनीचा दहा चाकी हायवा तिचा चिसी नंबर
MEC२४१७BLJP०७५९६२ व इंजिन नंबर ४००९५३D००७६०२८ असा असलेली
जु.वा. किं.अं. २) ६०,०००/- रु किमतीची ६ ब्रास शासकिय वाळु डंपरच्या मागील हौदामध्ये मध्ये मिळुन आली ती.

१५,६०,०००/- एकुण

वरील वर्णनाची व किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर विनानंबरचा हायवा व वाळुचा पंचनामा पोहेकॉ / ९३६ नानासाहेब गर्जे यांनी जागीच करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन आरोपी व मुददेमालासह पोलीस स्टेशनला आलो.

चालक व मालक नामे शब्बीर बादशाह शेख वय ३२ रा. लाडजळगांव ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर यांचे विरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे ,पोकॉ/ रंजीत पोपट जाधव यांनी भादवि कलम ३७९ प्रमाणे फिर्याद आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल/ विजयकुमार बाळासाहेब वेठेकर, पोना/ लक्ष्मण चिंधु खोकले,पोकॉ/ रंजीत पोपट जाधव, पोना/शंकर संपत चौधरी,पोना /रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोकॉ/ कमलेश हरिदास पाथरुट,पोकॉ/ शिवाजी अशोक ढाकणे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे