आनंद महाविद्यालयालयाच्या हिवाळी शिबिरास सुरुवात

पाथर्डी (प्रतिनिधी)
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन श्री क्षेत्र मढी देवस्थान येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. सुरेशलालजी कुचेरीया यांच्या हस्ते संपन्न झाले.तर कार्यक्रमाचे आध्यक्ष म्हणून धरमचंदाजी गुगळे विश्वस्त श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी, हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. राधाकीसन मरकड अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान संस्था मढी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार, प्रा. विलास भगत उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री गुगळे म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांचे सर्वागीण विकासासाठी आत्यंत महत्वाचा घटक आहे.आपण या सात दिवसांमध्ये होणारे वेगवेगळे उपक्रम या मध्ये हिरीरीने भाग घ्यावा व आपले व्यक्तिमत्व सुधारून घ्यावे .तसेच खजिनदार सुरेशजी कुचेरिया . प्राचार्य डॉ. शेषराव पवार ,प्रा. अजिंक्य भोडे आदींची भाषणे झाली.त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की युवक हे देशाचे भविष्य असुन युवकानी श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवावे व शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी , प्रा. अनिता पावसे, प्रा. डॉ जगन्नाथ बर्शिले प्रा.नितिन धुमने,डॉ.विकास गाडे.डॉ.अनिल गंभीर,प्रा. दत्ताराम बांगर आदी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ सह विध्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ इस्माईल शेख यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.जयश्री खेडकर यांनी केले तर आभार प्रा.डॉ. बाथुवेल पगारे यांनी मानले