अहमदनगर येथे 10 मार्च रोजी विभागीय डाक अदालतीचे आयोजन
अहमदनगर दि.३ (प्रतिनधी) – सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित असलेल्या पोस्टाच्या सेवेबद्दल केलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी पोस्ट विभागातर्फे डाक अदालतीचे आयोजन करण्यात येते. अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ डाकघर अधीक्षक, अहमदनगर विभाग, दुसरा मजला, हेड पोस्ट ऑफिस, अहमदनगर येथे 10 मार्च, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रार अर्जाच्या मूळ अर्जाची प्रत, तक्रारीचा तपशील इत्यादी माहिती नमूद करुन यासंबंधीचा अर्ज श्री. एस. रामकृष्णा, वरिष्ठ अधीक्षक, अहमदनगर विभाग, अहमदनगर-414 001 यांच्याकडे 5 मार्च, 2022 रोजी किंवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने द्विप्रतीत पाठवावी. त्यानंतर मिळालेल्या अर्जांचा डाक अदालतीत समावेश करण्यात येणार नाही. एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. तक्रारदाराने डाक अदालतीमधे स्वखर्चाने उपस्थित रहावे असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.