हॉस्पिटलच्या अनधिकृतपणे चालू असलेल्या रस्त्याचे काम थांबवण्याची मागणी- स्वप्नील शिंदे.

अहमदनगर दि.१२ मार्च (प्रतिनिधी)- स्टेशन रोड कोठी येथील एका हॉस्पिटल ने समोरील बाजूस रस्ता असून देखील हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस जेथे नागरी वस्ती आहे. तेथे अनधिकृतरित्या रस्त्याचे काम चालू केले आहे. व हॉस्पिटल समोरून पार्किंग असताना ते त्या रस्त्याचा वापर व्यवसायिक करण्यासाठी करीत आहे. व हॉस्पिटल मागील बाजूने अनधिकृतरित्या जबरदस्ती रस्ता काढत असून. त्या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना रहदारीस अडथळा होत आहे. तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची चिंता देखील वाढली असून या हॉस्पिटलने अनधिकृत पद्धतीने रस्त्याचे काम चालू केले असून ते काम लवकरात लवकर बंद करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे व कोठी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. तसेच येत्या 8 दिवसात रस्त्याचे काम थांबवून हॉस्पिटल वर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.