मिरजगावसाठी आ. रोहित पवारांच्या प्रयत्नातून स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय मंजूर, १३.६४ कोटींच्या रुग्णालयास प्रशासकीय मान्यता

कर्जत (प्रतिनिधी) : दि ११ मार्च
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आ रोहित पवार यांनी राज्य सरकारतर्फे नवीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. मिरजगाव आणि परिसरातील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून आ पवार यांनी रुग्णालयासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत राज्य सरकारच्या निधीतून मिरजगाव येथील राज्य महामार्गालगतच रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल.
मिरजगाव आणि परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालयाची मागणी होती. आ पवार यांनी हा मुद्दा वेळोवेळी लावून धरला होता. त्यानुसार आता मिरजगावमधील नागरिकांसाठी एकूण ५० खाटांचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. शासनाकडे या उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेचा १३.६४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने अत्याधुनिक व सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मिरजगावमध्ये उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिरजगावलगत दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहे. यावर अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने या उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता भासत होती. त्यामुळे येत्या काळात या रुग्णालयात अतिदक्षता विभागदेखील सुरु करण्यात येईल असे आ रोहित पवार यांनी म्हटले आहे.
**** कर्जत जामखेडमधील दोन्ही मोठ्या रुग्णालयांचा दर्जा देखील आता सुधारला आहे. त्याचबरोबर मिरजगाव या भागातील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केली. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री व सरकारचे आभार. यापुढे देखील आरोग्यावर लोकांचा होणारा खर्च कमी करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे.
– आ रोहित पवार
कर्जत-जामखेड मतदारसंघ