अखेर किर्ती (कसबे) भेटे व विश्वनाथ कसबे हत्याकांड प्रकरणी आरोपी महेश भेटे याच्यासह आई वडील आणि पोलीस भावावर तोफखाना पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट व कौटुंबिक हिंसाचारा प्रमाणे गुन्हा दाखल! रात्री उशिरा अमरधाम येथे अंत्यसंस्कार

अहमदनगर( प्रतिनिधी ):-घरगुती वादातून पत्नी व सासऱ्याला निर्दयीपणे लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी नगर शहरातील तपोवनरोड भागातील भिस्तबाग महाल परिसरात घडली होती.या मारहाणीत किर्ती महेश भेटे (वय २२,रा. ढवणवस्ती,नगर) व विश्वनाथ केशव कसबे (वय ५४,रा. ढवणवस्ती) या दोघांना महेश माणिक भेटे (रा.ढवण वस्ती, नगर) याने मारहाण केली होती कीर्ती आणि विश्वनाथ हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यामुळे पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र पाच दिवसाच्या संघर्षात कीर्ती आणि विश्वनाथ या बाप लेकीचा ७ ऑक्टोबर रोजी दुर्देवी मृत्यू झाला.दि.७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पुण्यावरून कीर्ती आणि विश्वनाथ यांचे मृतदेह नगर मध्ये आल्यानंतर समस्त आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी महेश याला साथ देणाऱ्या त्याच्या कुटुंबांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला होता कीर्ती आणि विश्वनाथ यांच्या मृतदेह असलेली रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच उभा करण्यात आली होती सर्व समस्त आंबेडकर समाज बांधवांनी तोफखाना पोलीस स्टेशन गाठले त्यामुळे काही काळ तणाव झाला होता.मात्र तोफखाना पोलिसांनी पुन्हा एकदा कीर्तीची आई रेखा कसबे हिचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला त्यानुसार घरगुती हिंसाचार आणि अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्यानुसार महेश याचे आई-वडील मंगल आणि माणिक भेटे भाऊ मोहन भेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा कीर्ती आणि विश्वनाथ यांच्यावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.