शिर्डी ( प्रतिनिधी शेख युनूस अ. नगर)
वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज दाखल करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने विविध समाज्यातील वयोवृध्द , महिला व तरुणांचा सहभाग
गाडी – घोड्याची अपेक्षा न ठेवता कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देवून प्रभागातून , गावांतून 50% मतदान घडवून आणा व उत्कर्षाला मोठ्या मतांच्या फरकाने विजयी करा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले .
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी झालेल्या विराट सभेला मोबाईद्रारे उपस्थितीत असणाऱ्या मतदार व कार्यकर्त्यांना संबोधिले .
यावेळी संघराज रुपवते , सुशिलाताई रुपवते , दशरथ सावंत , आबा जाधव , विशाल कोळगे , दिलीप कदम , सुहास राठोड , सचिन बनसोडे , महेश पाखरे , ऋषिकेश जगताप , प्रविण पाळंदे , जाधव दिशा पिंकी शेख , निलेश जगधने , चंद्रकांत सरोदे , शांताराम संगारे , बापू रणधीर आदीसह मोठ्या संख्येने मुस्लीम , धनगर , मराठा , बौध्द , आदीवाशीसह विविध समाज्यातून वयोवृध्द , महिला , तरुण वर्ग उपस्थित होते .
यावेळी उत्कर्षाताई म्हणाल्या की , मी तुमच्याचं घरातील लेक असून कै रुपवते , कै चौधरी यांचा सामाजिक , राजकिय वारसा घेवून मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे शिर्डी मतदारसंघातील बेरोजगारी , पाण्यासह विविध उद्भवणाऱ्या समास्या दूर करण्या ऐवजी आजी – माजी खासदार हे केवळ एकमेकांची धुंणे धूत असून त्यांना समाज्याचं एकमात्र घेणे नाही . त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आपली जबाबदारी वाढली असून कमी कालावधीत लोकांपर्यत पोहचायचे आहे तेव्हा तरुणांनी आपणचं उमेदवार समजून वाड्या – वस्त्यांवरील , गावातील व प्रभागातील लोकांना विनंती करून मतदान घडवून आणा .आपली लढाई ही जनशक्ती विरोध धनशक्ती असून बिळात लपून राहणाऱ्यांना बिळातचं ठेवा . तर स्वयंस्फुर्तीने काम करणाऱ्यांनी अद्रुषय शक्ती पासून सावध रहा . युती अथवा आघाडीचे लोक फक्त संविधाना बाबत गप्पा मारतात . मात्र संविधानाचे रक्षण हे आपल्यालाचं कराचे असून संविधान बदलण्याची कोणाची हिंमत नाही तर संविधान व शिर्डीच्या विकासाकरिता ही लढाई आहे तेव्हा तुमची मला महत्वांची साथ हवी असे भावनिक आवाहन उत्कर्षाताई रुपवते यांनी केले . आपण ही लढाई जिकण्यासाठीचं उतरलो , आता गुलाल आपलाचं . . .
यावेळी संघराज रूपवते म्हणाले की , शिर्डी मतदार संघातील युती , आघाडी चे उमेदवार हे खऱ्या अर्थाने काळू – बाळूचं आहे . आता हे दोन्ही भाऊ नको तर आपलेला भिमाची वाघिण हवी , उत्कर्षासारखी सर्वंगुण संप्रन्न असणाऱ्या व्यक्तीमत्वाला संधी दया हे उगवते नेतृत्व आहे .
कामगार नेते दशरथ सावंत म्हणाले की , लोकं प्रस्थापितांना कंटाळल्याने प्रर्यायी मार्ग शोधत होते मात्र उत्कर्षा रूपवतेच्या माध्यमातून पर्यायी मार्ग सापडला असून या लुटारूना त्यांची जागा दाखवून घराणे शाही नष्ट करा तर प्रकाश आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे भविष्य नक्कीचं उजवेल होईल . तर अकोले तालुका हा क्रांतीकारी असून यावेळी नक्कीचं क्रांती घडेल .
आबा जाधव म्हणाले कि , वंचित चे उमेदवार हे तरुण महिला असल्याने ही सोनेरी संधी आहे संधीचे सोनं करा , आपली निवडणुक लोकानी हातात घेतली आहे .एका निष्ठावंतांला म्हणून उमेदवार मिळाली
यावेळी ही उमेदवारी अर्ज भरण्याची सभा नसून विजयी सभा असल्याचे अनेक वक्तांनी म्हटले मुस्लीम , धनगर , आदीवाशीचा यावेळी पाठिंबा मिळत होता .
यावेळी कडाक्याच्या उन्हात वयोवृध्द , महिला , तरुणांनी विविध प्रकारे घोषा बाजी करत रॅली सहभागी होवून दोन कि मी पायी चालत चालले .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा