प्रशासकिय
एन एस एफ डी सी योजना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात सुरु महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांची माहिती

पुणे दि. 26 डिसेंबर (प्रतिनिधी )
साठे महामंडळात मोठा घोटाळा झाल्यानंतर अनेक वर्षापासून बंद असलेली अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे एन एस एफ डी सी योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली या महामंडळाचे रुपये 105 कोटी थकीत असल्याने त्यांच्याकडून निधी मिळणे 2015 पासून बंद होते, परंतु सर्व थकीत रक्कम भरणा केल्यामुळे मुदत कर्ज प्रकल्प पाच लाख, महिला समृद्धी योजना प्रकल्प रुपये एक लाख 40 हजार, लघु पूर्ण योजना प्रकल्प रुपये एक लाख 40 हजार, या तीन योजनांसाठी 3500 लाभार्थी करिता रुपये 100 कोटी निधी मागणीचे प्रस्ताव एनएसएफ डीसी महामंडळास मान्यतेसाठी साठे महामंडळांनी सादर केलेले आहेत. एक महिन्यांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन एन एस एफ डी सी ने दिलेले आहे
,मातंग समाज युवक युवतींसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी तीस लाख व परदेशांतर्गत शिक्षणासाठी 40 लाख कर्ज देण्याकरिताचे प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागवले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एनएसएफडीसी च्या निधीमधूनच मंजुरी देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
त्याचबरोबर महामंडळाची थेट कर्ज योजना प्रकल्प मर्यादा एक लाखापासून पाच लाखापर्यंत करण्याचा प्रस्तावही सादर झालेला आहे, बीज भांडवल योजना शिष्यवृत्ती योजना अशा योजना महामंडळात चालू आहेत, त्याचबरोबर महामंडळ मार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येताना दोन सक्षम जामीनदार शासन निर्णयात नमूद केल्यापासून घेण्यात येतात ,जमीनदार घेण्याकरिता जाचक अटी शिथिल करण्याकरता समाजातील आणि कार्यकर्ते सामाजिक संघटना व समाज बांधवांकडून निवेदन वेळोवेळी प्राप्त होतात या अनुषंगाने या अटी शिथिल करण्याचा प्रस्तावही महामंडळाने शासनाला सादर केला असून त्यावरही लवकरात लवकर शासनाने कार्यवाही करावी असे निवेदन महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून नागपूर येथे दिले आहे.