महामानव डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित भीमा कोरेगाव ते अहमदनगर महाज्योत रॅलीचे किरण काळेंच्या हस्ते स्वागत

अहमदनगर दि १७ एप्रिल (प्रतिनिधी) : महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भीमा कोरेगाव ते अहमदनगर शहरातील आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य महाज्योत रॅलीचे स्वागत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अक्षय भिंगारदिवे मित्र मंडळातर्फे युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भीमप्रेमी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भीमा कोरेगाव येथे अभिवादन करून या महाज्योत रॅलीला सुरुवात झाली होती. यामध्ये अक्षय भिंगारदिवे मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत सहभागी झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास या रॅलीचे नगर शहरात आंबेडकर पुतळ्याच्या इथे आगमन झाले असता काळे यांच्या हस्ते महाज्योतीला हार घालून यावेळी डॉ.आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
काळे यावेळी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या प्रेरणेतून भव्य महाज्योत रॅली काढून युवकांनी दिलेला संविधान वाचवाचा संदेश समाजासाठी महत्त्वाचा आहे. संविधान टिकल तर देश टिकेल. आज रोजगार, महागाई या विरुद्धची लढाई लढत असताना संविधान वाचवण्यासाठी देखील रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आहे. या लढाईमध्ये युवकांचा वाढत चाललेला सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सध्या देशातील युवकांमध्ये एकूणच असणाऱ्या राजकीय अस्थिर परिस्थितीबद्दल चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. युवकच आगामी काळात देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत परिवर्तन घडवतील.
युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे म्हणाले की, भीमप्रेमींनी बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशावर मार्गक्रमण करावे. विशेषत: तरुण पिढीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य हाती घ्यावे.
यावेळी काँग्रेस एससी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, मयुर भिंगारदिवे, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापु चंदनशिवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्ष पूनमताई वनंम, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, महिला उपाध्यक्ष शैलाताई लांडे, जिल्हा सरचिटणीस मनसुखभाई संचेती, रतिलाल भंडारी, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, युवक सरचिटणीस आकाश आल्हाट, अभिनय गायकवाड इंजिनिअर सुजित क्षेत्रे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, मायाताई चंदनशिवे, विकी करोलिया, हर्षल काकडे, रोहित वाकडे, रजत सारंगधर, शंकर आव्हाड, आप्पासाहेब लांडगे, युवक शहर संघटक विनोद दिवटे, युवक शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, सुहास त्रिभुवन, रामभाऊ धोत्रे, ब्लॉक काँग्रेस कमिटी सदस्य हनीफ मोहम्मद जहागीरदार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.