मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोणाच्या दहशती खाली? :- योगेश साठे
मुळा पाटबंधारे विभागाचे जन माहिती अधिकारी आदेश असताना देखील माहिती देण्यास हेतूपुरस्पर करतात टाळाटाळ

अहमदनगर दि.१३ मे (प्रतिनिधी):- येथील मुळा पाटबंधारे विभाग येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुळा पाटबंधारे विभाग,राहुरी,नेवासा आणि अमरापुर येथे शाखा अभियंता म्हणून काम पाहणारे श्री. हेम्बडे विद्यमान उपविभागीय अधिकारी नेवासा यांच्या कार्यकाळतील झालेल्या कामाची माहिती मागितली होती संबंधित शाखा अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती पत्रव्यवहार न केल्याने अर्जदार योगेश साठे हे प्रथम अपिलीय अधिकारी कु.सायली पाटील कार्यकारी अभियंता यांच्या सामने सदर विषयी अपिलात गेले असता अपिलार्थी यांनी राहुरी,नेवासा यांनी माहिती अधिकार अर्ज मिळाल्यानंतर पहिल्या पत्रात माहिती पाहणे कामी व माहिती घेऊन जाणे कामी साठी सोयीची वेळ तारीख कळवावी आणि त्यास अनुसरून १० दिवसाच्या कालंतराने त्याच संबंधित दुसरे पत्रात सदर माहिती ही संबंधित कार्यालयाशी निगडित नाही सदर बाब ही निदर्शनास आणून दिली.गेल्या काही दिवसांपूर्वी मुळा धरण येथे कालबाह्य झालेली शासकीय बोट ही परस्पर विकण्यात आली त्यासाठी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी चौकशी समिती मध्ये श्री हेंबाड आणि अन्य उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्यात आला त्यापुढे काय त्या बोटीचा तपास लागला की नाही,बोट परस्पर विकत घेणारे कोण त्यांना कोणी विकली त्याला कोणत्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होता काय असे विचारले असता सदर प्रकरणाची अजून चौकशी चालू आहे असे सांगितले. तसेच श्री हेंबाडे यांच्या काळात सदर कामे ही बोगस निकृष्ट दर्जाची बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते व कोट्यवधींचा झालेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून सदर माहिती देण्यास हेतूपुरस्पर टाळाटाळ करीत आहे. अपीलार्थी यांना विनामूल्य सात दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता कू.सायली पाटील यांनी देण्यात आले होते त्याचा पाठपुरावा करताना योगेश साठे यांना असा अनुभव आला की, संबंधित जनमाहिती अधिकारी पी.बी.अकोलकर उप कार्यकारी अभियंता हे काहीना काही कारणास्तव वेळ काढू पना करीत असल्याचे निदर्शनास आले परंतु योगेश साठे यांनी स्मरण पत्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले तरी देखील साठे यांच्या पत्राची दखल न घेतल्याने योगेश साठे हे दुसऱ्या अपील नाशिक यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. व त्यासंबंधी मुख्य अभियंता नाशिक सिंचन भवन यांना देखील याबाबत तक्रार योगेश साठे यांनी केली आहे.या तक्रारीत असे म्हंटले आहे की श्री हेंबाडे उपविभागीय अधिकारी यांचे राजकीय संबंध व हाय लेव्हल काँटॅक्ट यामुळे पाणलोट क्षेत्रातील सामान्य शेतकरी व मजूर संस्था या यांचे विरुद्ध तक्रार करण्यास धजत नाही. श्री हेंबाडे यांनी यांच्या काळात कॅनॉल दुरुस्ती,दरवाजे बदलणे, लायनींग, कॅनॉल मधील झाडेझुडपे काढणे यासारख्या छोट्या मोठ्या कामात शासकीय निधीचा वापर करून देखील बोगस संस्थांच्या नावाने बनावट बिल तयार करण्यात आली तसेच शासनाची फसवणूक करून अवैध रित्या कोट्यावधींची माया जमविली आहे याप्रकरणी शासनस्तरावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.श्री योगेश साठे यांनी सांगितले की या प्रकरणावर कोणतीही अपेक्षित अशी कारवाई लवकर न झाल्यास मुख्य अभियंता नाशिक यांचे कार्यालय समोर मोठ्या प्रमाणावर मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लाभधारक व श्री. हेंबाडे यांच्या दहशत दबावाला बळी पडलेले त्रस्त व्यक्तींना घेऊन पुरव्यांसह जन आंदोलन करण्यात येईल अशी माहिती दिली.
सोबत:- प्रथम अपिलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे कू.सायली पाटील यांनी केलेला आदेश प्रत,
मुख्य अभियंता नाशिक यांना दिलेले पत्राची प्रत