स्वातंत्र्यदिनी श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुईगव्हाण येथे बक्षिस वितरण सोहळा

कर्जत (रुईगव्हाण): श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने रुईगव्हाण गावातील प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण सोहळा दि.15 ऑगस्ट मंगळवार रोजी पार पडला.
श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे-चखालेवाडी* यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवादिनी प्रमाणपत्र, ट्रॉफी आदींनी गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठानच्यावतीने हभप निंबाळकर महाराज, राहुल चखाले,अमोल खटके, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर निघुल, दिगंबर ढोले, आशु बुरुंगे, नाना शिंगाडे,अमोल बुरुंगे यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अश्विनी दत्तात्रय जामदार, मा. सरपंच अशोक रामचंद्र पवार,मा. सरपंच राजेंद्र श्रीधर पवार,चेअरमन संदिप मानसींग जामदार, मा.चेअरमन, सुनिल जगन्नाथ पवार,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सतिश आण्णासाहेब जामदार तसेच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक नितीन पवार यांनी केले.