भोसे दि. 4 जानेवारी (प्रतिनिधी )
श्री संत बाळूमामा मेंढी माऊली प्रतिष्ठान भोसे चखालेवाडी ता.कर्जत येथील भाविक भक्तांकडून गुरुवर्य सद्गुरू श्री मनोहर मामा यांचा पाद्यपूजन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी गुरवर्यांच्या स्वागतासाठी श्री संत बाळूमामा मेंढी माऊली मंदिर परीसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. फटाक्यांच्या आतिषबाजीने तसेच ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत मोठ्या जल्लोषात मामांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर मामांचे औक्षण करून सद्गुरूंच्या हस्ते श्री संत बाळूमामा यांची आरती करण्यात आली.
यावेळी मामांच्या भक्त परिवाराकडून सदगुरु मनोहर मामा यांचे पाद्यपूजन मोठ्या उत्सवात आणि आनंदाने करण्यात आले. या कार्यक्रमास हभप गणेश महाराज सुडके, हभप निखील महाराज क्षिरसागर, हभप बापुराव उकिर्डे, हभप सुनील पोकळे, ब्राह्मण काका प्रदिप मुळे, लतिफभाई शेख, माजी सरपंच राजेंद्र केशव ढोले, बाळासाहेब थोरात, गणेश रामराव खराडे, चेअरमन सुरेश चव्हाण(गुरुजी), माजी सरपंच अविनाश चव्हाण, मयुर दादासाहेब खराडे, अस्लम कसबे, राहुल चखाले, उपसरपंच अमोल खटके, बाळासाहेब गाढवे, युवराज ढोले, दिनेश शेळके, बाळासाहेब श्रीराम, किरण चव्हाण,भाऊसाहेब शिंदे तसेच भाविक भक्त उपस्थीत होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मोहन सांगळे, रोहीत धालवडे, महेश ढोले, दादा चव्हाण, सुधाकर चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा