महिला दिनानिमित्त महिलांसाठी योगासन शिबिराचे आयोजन

महिला दिनानिमित्त महिलांसाठी योगासन शिबिराचे आयोजन
केडगाव प्रतिनिधी
अहमदनगर गोल्ड जिम सुख योगा यांच्या वतीने ८ मार्च दिनाचे औचित्य साधून मुली व महिला यांसाठी खुले योगासनाचे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
महिलांनी नोकरी व घरकामाकडे लक्ष देताना आपल्या शरीराकडे लक्ष देताना योगासने करून उत्तम आरोग्य प्राप्त करावे हा या शिबिराचा उद्देश आहे .
हे शिबिर सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक मध्ये दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या शिबीरासाठी शांततेचे प्रतीक असलेले पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून यावे तसेच योगासने करण्यासाठी योगा मॅट किंवा चटई स्व:ताची घेऊन यावी .
या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय योगा शिक्षक सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहिती करता ९६७३३३१४१४ किंवा ९२७३३३१४१४ या भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधावा. या योगा शिबिराचा लाभ जास्तीत जास्त मुली व महिलांनी घेऊन शरीरासाठी असलेले योगासनाचे महत्त्व समजून घ्यावे असे आवाहन शिबिराचे आयोजक सागर पवार यांनी केले आहे .