मुळा पाटबंधारे विद्यमान कार्यकारी अभियंता यांच्या भ्रष्टाचाराला प्रशासन घालतय पाठीशी! विद्यमान कार्यकारी अभियंता व इतर उप अभियंत्यांनी केलेल्या २१ कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा : योगेश साठे

अहमदनगर( प्रतिनिधी) :अहमदनगर मुळा पाटबंधारे विद्यमान कार्यकारी अभियंता कु.सायली.रा.पाटील यांचे अधिपत्याखालील उपकार्यकारी अभियंता मु.पा.वि.नगर,उपविभागीय अधिकारी.राहुरी.नेवासा.घोडेगाव.कुकाणा.अमरापुर.मु.पा. उप.वि.अहमदनगर, व संबंधित शाखा अभियंता यांनी केलेल्या व चालू असलेल्या कामात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा असे निवेदन मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे करण्यात आले
सन २०१९ पासून आज तारखेपर्यंत वरील सर्व नमूद वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी यांनी संगनमताने शासनाची मंजुरी असलेले काम १) सन २०१९ ते सन २०२० मध्ये (कोटीत) रू ८,१३,५२,८१४/-, २) सन २०२० ते सन २०२१ मध्ये (कोटीत) रू ८,०८,६९,७६७/-, ३) ०१/०४/२०२१ ते आज तारखेपर्यंत सरासरी अंदाजे झालेल्या काम आणि चालू असलेल्या कामात १५ ते २१ कोटींचा अपव्यवहार झाल्याचे निदर्शनास येते.मुळा धरण परिसरात २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्षरोपना वर १८ लक्ष रू खर्च दाखवला असून
मुळा परिसरात ३३ कोटी वृक्ष लागवड झाली असती तर आजपावेतो त्या ठिकाणी जंगल व्हायला हवे होते परंतु तसे कोठेही दिसून येते नाही.जिथं पुलाची गरज नाही तिथं दोन वेळा पुलाचे काम कागदोपत्री दाखवून तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली २५ लाख रुपयाचे पुलाचे काम या वरील अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला घोटाळा निदर्शनास आला आहे, याचाच सरळ अर्थ शासनाची फसवणूक व शासनाच्या निधीचा गैरवापर करून अपहार करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते.एवढेच नाही तर परंतु एकाच चारीवर तेचतेच कामे दाखवून दरवर्षी लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला आहे.वारंवार एकसारखे दरवर्षी कामे दाखवून शासनाची कोट्यावधींच्या निधीचा गैरवापर होऊन भ्रष्टाचार केल्याचे आढळून येत आहे . याची सर्व माहिती व पत्रव्यवहार मा.मुख्य अधीक्षक अभियंता संजय बेलसरे,उत्तर महाराष्ट्र नाशिक यांना देखील वेळोवेळी कळविली आहे तरीदेखील मुख्य अधीक्षक अभियंता संजय बेलसरे उत्तर महाराष्ट्र नाशिक यांनी तक्रारदाराच्या कोणत्याही पत्र व्यवहारास प्रतिसाद न देता व त्यावर कारवाई न करता संबंधित सर्व अधिकारी यांना पाठीशी घातले आहे. यावरून स्पष्ट होते की झालेला सर्व भ्रष्टाचार हा सर्वांच्या संगणमताने होत आहे.नुकताच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वराय्या यांचे जयंती निमित्ताने अभियंता दिन सर्वत्र साजरा करण्यात आला असून यावेळी मुख्य अधीक्षक अभियंता संजय बेलसरे जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र नाशिक यांनी प्रोत्साहन पर उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाचे सायली पाटील कार्यकारी अभियंता सह उपकार्यकारी अभियंता,उपविभागीय अधिकारी आणि शाखा अधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले हे पुरस्कार त्यांना उत्कृष्टरित्या भ्रष्टाचार केल्या बद्दल दिला आहे असे साठे यांनी सांगितले, त्यामुळे सायली राजेंद्र पाटील कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, श्री.प्र.ब.अकोलकर उपकार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर, श्री.स.की.हेम्बाडे उपविभागीय अधिकारी मुळा पाटबंधारे उपविभाग नेवासा/घोडेगाव, श्री.शरद कांबळे उपविभागीय अधिकारी मुळा पाटबंधारे उपविभाग राहुरी, श्री.बी.आर.लबडे उपविभागीय अधिकारी मुळा पाटबंधारे उपविभाग अमरापुर, उपविभागीय अधिकारी मुळा पाटबंधारे उपविभाग कुकाना, कार्यरत असलेले शाखा अधिकारी या सर्वांची कायदेशीर मार्गाने चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन कामासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीस/कामास मंजुरी देण्यात येऊ नये. सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाची बिले अदा करण्यात येऊ नये असे आदेश पारित करण्यात यावे अशी ही मागणी मुख्यमंत्र्यांना करणार आहेत, तसेच या आधी ही अनेकांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे शासन शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवून शेतीतील सर्व कामे सोयीस्कर व्हावे यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करीत आहे. तसेच महाराष्ट्रातील धरण क्षेत्रातील लाभधारक यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन शेती सुलभ करण्यासाठी निधी दिला जातो. या निधीचा विनियोग हा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही असे दिसून येते त्याला अशा भ्रष्ट आधिकऱ्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागते.या सर्वच गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाने दखल घेऊन त्वरित या आधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अन्यथा
लवकरच औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.