जमजम कॉलनी, संगमनेर येथे स्थानिक गुन्हे शाखेचा छापा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे गोमास, साधने व टेम्पो ताब्यात

अहमदनगर दि. २२ ऑगस्ट (प्रतिनिधी)
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना/सचिन आडबल, संतोष लोढे, गणेश भिंगारदे, पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव अशांना कळविले आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे अब्दुल कुरेशी रा. जुना जोर्वेरोड, संगमनेर हा महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांची कत्तल करुन, गोमास एका छोटा हत्ती टेम्पोत भरत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील प्राप्त माहिती प्रमाणे खात्री करुन जुना जोर्वे रोड, जमजम कॉलनी, संगमनेर परिसरात ठिकाणी कारवाई करुन 600 किलो गोमास व तुकडे, एक सत्तुर, एक सुरा व एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण 4,20,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन व गु.र.नं व कलम आरोपीचे नाव जप्त मुद्देमाल
1. संगमनेर शहर 742/23 भादविक 269, 34 सह मपुसुअक 5 (क), 9 1) अब्दुलहमिद अहेमद कुरेशी वय 29,
2) महंमद समशाद आलम शेख (फरार)
दोन्ही रा. जमजम कॉलनी, जुना जोर्वे रोड, ता. संगमनेर 4,20,000/- 600 किलो गोमास व तुकडे, एक सत्तुर, एक सुरा व एक छोटा हत्ती टेम्पो
एकुण 2 पुरुष आरोपी 4,20,000/- 600 किलो गोमास व तुकडे, एक सत्तुर, एक सुरा व एक छोटा हत्ती टेम्पो
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, व श्री. सोमनाथ वाघचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.