कर्जत शहर आणि तालुक्यात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कर्जत (प्रतिनिधी) : दि १५ एप्रिल
कर्जत शहर आणि तालुक्यात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भास्कर भैलुमे मित्रमंडळाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी “जय भीम” घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
कर्जत शहर आणि तालुक्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकराची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील प्रत्येक प्रभागात यासह चौकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षणाचे व्यासपीठ उभारून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ रोहित पवार, माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह सकल मराठा समाज कर्जतचे प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. यावेळी जय भीमच्या घोषणेने परिसर दुमदुमला होता. यासह अजय भैलुमे मित्रमंडळाने १९६१ साली माजी आ स्व विठ्ठलराव भैलुमे यांनी प्रथमता कर्जतमध्ये बैलगाडीतून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूक काढली होती त्याची प्रतिकृती साकारत अभिवादन केले. तसेच अक्काबाईनगर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.