अंधमुक्त व्हिलेज या संकल्पनेतुन अमरापूर येथे नेत्ररोग तपासणी व शस्रक्रिया शिबीर संपन्न

शेवगाव दि.१६( प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी,फिनिक्स फाऊंडेशन आणि बुधराणी हॉस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी,रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव माने,माजी अध्यक्ष दिलीप फलके ,माजी सहप्रांतपाल संजय लड्डा,माजी सरपंच बाबासाहेब पोटफोडे,प्राचार्य लवांडे ,बाबा गरड,रवींद्र बोरुडे,जि.प.प्रा.शाळा अमरापूरचे मुख्याध्यापक बाप्पासाहेब मरकड,,बुधराणी हॉस्पिटलचे माया आल्हाट, सचिन सोनवणे,अमरापूर आरोग्य उपकेंद्राचे अनिल महानुभव, ललिता कासोळे,सुनीता बनसोडे,नंदिनी बनसोडे,आदी.उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच विजय पोटफोडे होते.या नेत्ररोग शिबिरामध्ये 118 रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.तपासणीमधून निवड झालेल्या 30 रुग्णांची शस्रक्रिया पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये लवकरच करण्यात येणार आहे.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये 107 लोकांनी डोळ्यांची तपासणी केली होती तर 17 लोकांच्या डोळ्यांची बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी रेणुकामाता मल्टीस्टेटचे मॅनेजर अक्षय देवकर,रोटरी व्हिलेज क्लबचे धनंजय खैरे,दीपक भापकर,संदीप खैरे,बंडू सुसे,तनिष्का अध्यक्षा संध्याताई पोटफोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लाडणे , प्रास्ताविक बाळासाहेब चौधरी तर आभार आरोग्यसेविका सुनीता बनसोडे यांनी व्यक्त केले.