फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची काँग्रेसची मागणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंती निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन

अहमदनगर दि. 3 जानेवारी (प्रतिनिधी ): क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शहरात उत्साहात पार पडली. जयंती निमित्त शहर काँग्रेसच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे त्याकाळी उघडी केली नसती तर आजही महिला घराबाहेर पडू शकल्या नसत्या.
सावित्रीबाई व महात्मा फुले या दांपत्याने तत्कालीन समाजामध्ये केलेल्या क्रांतिकारी कामामुळेच आज शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली आहे. फुले दांपत्याला केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी यावेळी बोलताना काळे यांनी केली.
यावेळी ओबीसी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, विलास उबाळे, गणेश चव्हाण, उषाताई भगत, मिनाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, अभिनय गायकवाड, रोहिदास भालेराव, गणेश चव्हाण, किशोर कोतकर, गौरव घोरपडे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, सचिन लोंढे, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, राजेंद्र तरटे, कौतिक शिंदे, दीपक ससाने, ऋषिकेश मेहत्रे, कारभारी बोरसे, बाबासाहेब हजारे, मुकेश भालेराव, ईश्वर भावखरे, अंबादास शेटे, कृष्णा शेंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, स्वतःच्या कुटुंबाला दिशा देण्याबरोबरच समाजाला ही दिशा देण्याची ताकद आजच्या महिलांमध्ये आहे. क्षेत्र कोणतेही असो सर्वच ठिकाणी आज महिला स्वकर्तृत्वाच्या बळावर पुढे येताना दिसत आहेत. आज राजकारण, समाजकारण, प्रशासन, क्रीडा क्षेत्र, उद्योगजगत, पत्रकारिता अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये अनेक महिला आपल्या कर्तृत्वाच्या बळावर नेतृत्व करत आहेत. ही बाब महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्याकाळी रोवली, ती रुजवली यामुळेच आजची महिला आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहू शकली आहे.