भागवत एकादशी निम्मित श्री संत बाळुमामा मेंढी माऊली प्रतिष्ठानतर्फे भोसे येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन

भोसे दि.25 डिसेंबर (प्रतिनिधी )
पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. भोसे येथून भागवत एकादशी निम्मित श्री संत बाळूमामा आणि श्री सद्गुरू मनोहर मामा यांच्या कृपाआशीर्वादाने दिंडी सोहळा श्री चैतन्यगिरी आत्माराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी मांदळी येथे पोहचली.पायी दिंडी सोहळ्यामध्ये भाविक भक्तांकडून आणि भजनी मंडळाकडून भक्तिमय वातावरणात आत्माराम बाबांचा, बाळूमामांचा आणि विठुनामाचा गजर करण्यात आला.
दिंडी सोहळ्याचे संपुर्ण नियोजन बाळूमामा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा किर्तनकार हभप निखिल महाराज क्षिरसागर, मृदुंगाचार्य हभप शुभम महाराज शिंदे, हभप शाहजी महाराज शिंदे कोसेगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भजनी मंडळ भोसे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
बाळूमामा पालखी सोहळ्यासाठी वाहनाचे व साऊंड सर्व्हिसचे नियोजन सामजिक कार्यकर्ते सचिन क्षिरसागर यांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच सकाळच्या फराळाची सोय प्रतिष्ठानतर्फे व दुपारच्या फराळाचे आयोजन खांडवीचे वैभव तापकीर व मोहन सांगळे यांच्या मार्फत करण्यात आली होती. यावेळी गावातील भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.