राजकिय

भिंगारच्या विविध प्रश्न संदर्भात छावणी परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवेदन शहरात अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यावरच छावणी परिषदेला पाणी कमी दरात उपलब्ध होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरांमधील पंचशील नगर ते देशमुख मंगल कार्यालय पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून त्या रस्त्यावरून ये जा करत असताना लहानापासून ते मोठ्या पर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊन जावा लागत असून रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी तसेच भिंगार मध्ये विविध ठिकाणी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात अंधार असून तेथे स्ट्रीट लाईट बसून चालू करण्यात यावे व शहरातून भिंगार मध्ये येताना किंवा जाताना भिंगार नाल्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रस्त्याने येणे जाणे मुश्किल झाले असून भिंगार नाल्याची व परिसरातील लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी व भिंगार शहरात असणाऱ्या कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून कीटकनाशक औषध फवारणी त्वरित करण्यात यावी व भिंगार शहरात काही नेतेमंडळीची चर्चा आहे की अमृत योजनेतून अहमदनगर महानगरपालिका व छावणी परिषदेमध्ये पाण्यासंदर्भात करारनामा झालेला असून अशी माहिती पसरवीत आहे याची देखिल चर्चा राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांशी केली असता समजले की अहमदनगर महानगरपालिका छावणी परिषदेच्या कोणत्याही करार झालेला नसून अहमदनगर महानगरपालिकेचे अमृत योजना पूर्ण झाल्यावर कमी दराने छावणी परिषदेला पाणी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले व छावणी परिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेडसाळ होत असून तेथे कर्मचाऱ्यांचा स्टाफ व तज्ञ डॉक्टर वाढवून कोरोनाची शक्यता नाकारता येत नसून उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी कार्यालयीन अधीक्षक सौ.पारनाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विशाल (अण्णा) बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले समवेत भिंगार शहराध्यक्ष संजयजी सपकाळ, नवनाथ मोरे, देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवम भंडारी, आ.संग्रामभैय्या जगताप युवा मंचचे अध्यक्ष पै.सागर चवडके, छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष संजय खताडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायचे अध्यक्ष सिद्धार्थ आढाव सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मारुती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य भिंगारदिवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे