केडगांव जागरूक नागरिक मंचची आंतरराष्ट्रीय योग दिनाची पूर्वतयारी सुरू!

केडगाव दि.१६ मे (प्रतिनिधी)
जागरूक नागरिक मंच २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन सामुहिक भव्य कार्यक्रमाने साजरा करणार आहे .नागरिकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी दिनांक ८ ते १५ मे दरम्यान पहिल्या टप्प्यातील विनामूल्य योगासन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा सफाई कर्मचारी जालिंदर शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. मंच आरोग्य समितीचे डॉ. सुभाष बागले व डॉक्टरांच्या निमा संघटनेच्या टीम सदस्यांनी सुव्यवस्थित नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. प्रसंगी मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच योगाचे महत्व विशद केले. अनेक नागरिकांनी उस्फूर्तपणे उपस्थिती लावून योगासनाचे विविध प्रकार शिकण्यास सुरुवात केली. मंत्रमुग्ध व प्रफुल्लित करणाऱ्या वातावरणात सदर शिबिर संपन्न होत आहे त्याबद्दल मंचला जालिंदर शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.पर्यावरण समितीचे उपाध्यक्ष उस्मान गनी मन्यार , मंचच्या महिला समिती उपाध्यक्ष मनीषा लहरे , मंदार सटाणकर , प्रवीण पाटसकर , स्नेहलता बागले , ओमकार नवरखेले , अतुल ढवळे , सद्दाम शेख , प्रकाश बिडकर, सुनील नांगरे ,शारदा शिरसाठ , अंबिका कंकाळ, निमा संघटना सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.