अंकुश चत्तर खुन प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या!

अहमदनगर दि. १७ जुलै (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 15/07/2023 रोजी आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण झाल्याने अंकुश चत्तर हा मुलांचे भांडण सोडवण्यासाठी आला असता यातील 7 ते 8 आरोपी काळे रंगाचे कार मधुन येवुन पुर्ववैमनस्यातुन स्वप्निल शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरुन अंकुश चत्तर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हातातील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेवुन जोराजोरात आरडा ओरडा व दहशत निर्माण केली. तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक व दुकानदार यांचेवर धाक निर्माण करुन अंकुश चत्तर याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. सदर घटने बाबत फिर्यादी श्री. बाळासाहेब भानुदास सोमवंशी, वय 42, रा. वांबोरी, ता. राहुरी हल्ली रा. गावडेमळा, पाईपलाईन रोड, अहमदनगर यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1030/23 भादविक 307, 323, 324, 325, 326, 143, 147, 148, 149, 108 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व म.पो.का.क. 37 (1)(3)/135, क्रि.लॉ.ऍ़.अ. 7 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी अंकुश चत्तर हा उपचारा दरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यास 302 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
सदर घटना गंभीर स्वरुपाची व संवेदनशील असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींना अटक करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ/भाऊसाहेब काळे, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भिमराज खर्से, पोकॉ/बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चापोहकॉ/चंद्रकांत कुसळकर, चापोकॉ/अरुण मोरे तसेच सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना/विशाल दळवी, संदीप दरदंले, फुरकान शेख, विशाल गवांदे, पोकॉ/रोहित येमुल, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार फरार आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज पाहुन आरोपींची ओळख पटवुन नगर शहर परिसरात शोध घेत होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासताना आरोपी हे काळ्या रंगाची एमजी कंपनीचे कार क्रमांक एमएच/16/सीएक्स/9393 मधुन अहमदनगर, शेवगांव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे जाताना दिसल्याने पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन वाशिम येथे जावुन आरोपीचा शोध घेत असताना आरोपींची काळ्या रंगाची कार हॉटेल गुलाटीचे बाहेर उभी असलेली पथकस दिसली. पथकाची खात्री होताच हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इसमाकडे सदर कार बाबत विचारपुस करता त्याने कारमधील इसम हॉटेलमध्ये राहण्यास आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने हॉटेल रुममधील इसमांना ताब्यात घेवुन पोलीस पथकाने ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) स्वप्निल रोहिदास शिंदे वय 40, रा. गुरुकृपा सोसायटी, श्रमिक बालाजी चौक, अहमदनगर, 2) अक्षय प्रल्हादराव हाके वय 33, रा. नंदनवन नगर, बंधन लॉन मागे, सावेडी अहमदनगर, 3) अभिजीत रमेश बुलाख वय 33, रा. दिपवन अपार्टमेंट, गजराज फॅक्ट्ररी जवळ, बेहस्तबाग, अहमदनगर, 4) महेश नारायण कु-हेवय 28, रा. साईनगर, वाघमळा, सावेडी, अहमदनगर, 5) सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे वय 25, रा. भुतकरवाडी, सावेडी अहमदनगर असे सांगितले. ताब्यातील संशयीताकडे अधिक विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना कार व त्यांचे मोबाईलसह ताब्यात घेतले.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक इतर फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे मिथुन धोत्रे हा रांजणी, बेल्हे, ता. जुन्नर येथे असले बाबत माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ राजंणी, बेल्हे, ता. जुन्नर येथे जावुन खात्री करता दोन इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 6) मिथुन सुनिल धोत्रे वय 23, रा. पवननगर, बेहस्तबाग, सावेडी, अहमदनगर व 7) एक विधीसंघर्षीत बालक असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले.
आरोपी स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे एकुण -7 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना गु.र.नं. 32/07 भादविक 323, 427, 143, 147
2. तोफखाना गु.र.नं. 432/09 भादविक 302, 307, 323, 143, 147, 504
3. कोतवाली गु.र.नं. 330/12 भादविक 448, 504, 506
4. तोफखाना 365/14 भादविक 323, 341, 34, 504, 506
5. चंदनझिरा जालना 119/15 भादविक 353, 337, 323, 427, 279
6. एमआयडीसी 216/22 भादविक 397, 341, 143, 147, 149
7. तोफखाना 178/2022 भादवि क 452, 342, 324, 354, 385, 427
आरोपी अभिजीत बुलाख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना गु.र.नं. 820/21 भादविक 307,143,147,148,427,504,506
आरोपी सुरज कांबळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द गंभीर दुखापतकरणे, जिवे मारण्याची धमकी देणे, आर्म ऍ़क्ट व इतर कलमान्वये एकुण -6 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 163/21 भादविक 341,324,325,143,147,504,506
2. तोफखाना 542/21 भादविक 504,506,201,34
3. तोफखाना 422/21 आर्म ऍ़क्ट 4/25 भादविक 34
4. तोफखाना 426/22 भादविक 324,504,506,143,147,148
5. एमआयडीसी 688/22 भादविक 324,143,147 मपोका 135
6. तोफखाना 135/23 दारुबंदी कायदा कलम 65(ई)
आरोपी नामे महेश कु-हे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना गु.र.नं. 305/21 भादविक 420,34
तोफखाना गु.र.नं. 426/22 भादविक 324,504,506,143,147,148
आरोपी मिथुन धोत्रे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 1087/21 भादविक 379,34
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.