सामाजिक
-
निलक्रांती चौक येथे 40 वर्षापासून “भीम उत्सवाचा ” जल्लोष! “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी ” या भीमगीतावर वातावरण झाले भीममय! महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन! अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सर्वत्र मोठया आनंदात साजरा होत असतो. जयंती सप्ताहानिमित्त निलक्रांती चौक येथे निलक्रांती मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमाताई जावळे यांच्या भीम बुद्ध गीतांचा गायन कार्यक्रम मोठया जल्लोषपूर्ण वातावरणात घेण्यात आला. क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत अभिवादन करून महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी”, “भीमराज कि बेटी मै तो जयभीमवाली हूं ” यासारख्या गाण्यामुळे सर्व वातावरण भीममय झाले होते. यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भीमराव पगारे,देशस्तंभ न्यूजचे पत्रकार महेश भोसले, निलक्रांती बग्गीचे संचालक सुनील साळवे, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश साळवे, किशोर साळवे,विनाताई कांबळे, अनुराधाताई साळवे, भगवानराव साळवे, शरद जाधव, विलास साठे सर, सुमेध गायकवाड, बाळासाहेब विधाते, नितीन कसबेकर, सतीशकुमार चाबुकस्वार सर, सुशांत म्हस्के, बोद्धाचार्य संजय कांबळे, रवींद्र वाघचौरे, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड,कक्ष्यप साळवे, सुमेध साळवे,विनोद भिंगारदिवे, सुरेश शिरसाठ, आकाश साळवे,रोहित (बंडू ) आव्हाड, राजेंद्र शिरसाठ, वृषाल साळवे, निखिल साळवे, श्रीकांत भोसले, प्रशांत भोसले, रवींद्र शिंदे, अविनाश शिंदे, विक्रम शिंदे, विनायक संभागळे,मनोज साळवे,गणेश साळवे, विनोद साळवे, सुशांत शिरसाठ, मयूर पाचारणे, गोपी साळवे, अक्षय वाघचौरे,सुशांत भोसले, संदेश भोसले,सुजित साळवे,किरण साळवे, महेर मिसाळ, अक्षय साळवे, मिलिंद साळवे, संदीप साळवे, तेजस पाचारणे, किरण पवार आदी कार्यकर्ते गौतमनगर व शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सर्वत्र मोठया आनंदात साजरा होत…
Read More » -
‘कुंकू लावील रमान’ या सुप्रसिद्ध गीताच्या गायिका सौ.सुषमा देवी यांच्या सुमधुर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम उद्या निलक्रांती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित कार्यक्रमाचे आयोजन!
अहमदनगर (दि.९ एप्रिल):-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त नगर शहरातील नीलक्रांती मित्र मंडळाच्या वतीने उद्या बुधवारी दि.१०…
Read More » -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत निळ्या झेंडयाशिवाय कोणताही झेंडा नको: अजय साळवे विश्व्रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादासाहेब रुपवते विद्यालय येथे सर्व आंबेडकरी चळवळीची बैठक संम्पन्न!
अहमदनगर दि. 6 एप्रिल (प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत निळ्या झेंडयाशिवाय कोणताही झेंडा नको. याचे महत्वाचे कारण…
Read More » -
जामखेड कला केंद्रावरील लेडीज डान्स बार डीजे चा वापर बंद करून लोक कलावंतांना संधी मिळणे बाबत निवेदन!
जामखेड दि. 21 मार्च ( प्रतिनिधी रोहित राजगुरू) जामखेड या ठिकाणी 9 सांस्कृतिक केंद्र आहेत. या केंद्रावरती पारंपारिक पद्धतीने पूर्वीपासून…
Read More » -
रिपाईच्या वतीने महाडच्या चवदार तळे सत्याग्रह दिन सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन; जय भीमचा गजर हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाचा बाबासाहेबांनी उध्दार केला -विवेक भिंगारदिवे
अहमदनगर दि. 20 मार्च (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सार्वजनिक चवदार…
Read More » -
कामगारांनी बैठकीवर बहिष्कार टाकत सहाय्यक कामगार आयुक्तांवर मूठभर ठेकेदारांशी संगनमताचा केला गंभीर आरोप
अहमदनगर दि. 18 मार्च (प्रतिनिधी) : अहमदनगर रेल्वे मालधक्क्या वरील कामगारांच्या नवीन त्रैवार्षिक करारा वरून मोठे वादंग निर्माण होण्याचे चिन्ह…
Read More » -
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान
अहमदनगर दि.14 मार्च (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२२- २३ चा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
भास्कर मोरेच्या निषेधार्थ आज जामखेड बंदची हाक तसेच अन्याय आत्याचाराचा लढा तीव्र करण्यासाठी समस्त भीमसैनिक जामखेड तालुका याच्या वतीने जाहिर पाठिबा
जामखेड दि. 13 मार्च ( प्रतिनिधी रोहित राजगुरू ) जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून…
Read More » -
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी.. अजय अतुल यांच्या झिंगाट गाण्यावर सुजय विखेंनी धरला ठेका..
नगर दि. 11 मार्च (प्रतिनिधी) काल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा…
Read More » -
जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी नवनागापूर येथे होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सुप्रसिद्ध गायक – संगीतकार अजय अतुल म्युझिकल नाईटचे ही आयोजन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांचीही उपस्थिती
अहमदनगर दि. 9 मार्च (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या…
Read More »