भाजपाची बुलंद तोफ माजी मंत्री अशिष शेलार उद्या पारनेरमध्ये

पारनेर दि.२४ मे ः (प्रतिनिधी )
भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार आशिष शेलार हे बुधवारी पारनेर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपाची संघटनात्मक बैठक पार पडणार असून बुथप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुखांसाठी यावेळी मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे.
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, ज्येष्ठ नेेते कृष्णाजी बडवे,जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, सुपे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर मैड, बाबासाहेब चेडे आदींच्या उपस्थितीत सोमवारी शेलार यांच्या दौऱ्याबाबत बैठक पार पडली. बैठकीनंतर शेलार यांच्या दौऱ्याची माहीती पत्रकारांना देण्यात आली.
लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकांचे बिगुल वाजणार असून त्यादृष्टीने शेलार यांचा हा दौरा महत्वपूर्ण माणला जात आहे.
बुधवारी दुपारी 3 वाजता पारनेरमधील बाजार समिती रस्त्यावरील आनंद लॉन येथे होणाया मेळाव्यात अशिष शेलार कार्यकर्त्यांना काय मंत्र देणार याची उत्सुकता आहे. शेलार हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ते विरोधकांवर कसा निशाना साधतात याकडेही तालुक्याच्या राजकिय वर्तुळाचे लक्ष आहे.