सामाजिक
छत्रपती शाहू महाराज जयंतनिमित्त साकुर येथे स्री पुरुष असमानता कार्यशाळा संपन्न!

- साकुर दि.२७ जून(प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील साकुर गावात आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्त साधून साकूर या ठिकाणी स्त्री पुरुष असमानता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन कासा संस्था मुंबई यांच्याद्वारे करण्यात आले होते .हा कार्यक्रम सौ .संगिता भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली व सुनिल गायकवाड सर (कासा संस्था,मुंबई)यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला . याप्रसंगी अर्चना गावडे,हिना शेख ,शमा शेख ,वैशाली राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनेक महिला पुरुषांनी कार्यक्रमाला हजेरी लावली .सुत्रसंचालन सुनिता बागुल यांनी केले. तर सुरेश बागुल यांनी आभार व्यक्त केले.यावेळी सामाजिक गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . या कार्यशाळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.