पारनेर दि. 15 मार्च – (तालुका प्रतिनिधी देवदत्त साळवे )
पिंपळगाव तुर्क ते कान्हूर पठार या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई लंके यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर नगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब होते.अध्यक्षीय भाषणातून बोलताना लंके म्हणाले पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क हे गाव एका बेटासारखी परिस्थिती असलेले गाव आहे.या ठिकाणी शेजारील गावांना जोडणारा एकही रस्ता सुस्थितीत नाही, पिंपळगाव तुर्क ते कान्हूर पठार या रस्त्याचे काम 2003 मध्ये झालेल होते आज या ठिकाणी रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढलेली आहे.परंतु या ठिकाणची रस्त्याची दुरावस्था पाहता गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांनी लंके साहेब यांचे कडे मागणी केल्यानंतर त्यांनी या रस्त्यासाठी 2.10 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. माननीय लंके साहेब यांनी पुढे बोलताना सांगितले पिंपळगाव तुर्क या छोट्याशा गावासाठी गेल्या 14 महिन्यांमध्ये जवळपास चार कोटी रुपयांचा निधी दिलेला असून त्यामध्ये दोन पाझर तलाव दुरुस्तीसाठी 51 लाख, केटीवेअर दुरुस्तीसाठी 6 लाख, हनुमान मंदिर सभा मंडप 20 लाख, मस्जिद मध्ये पेव्हिंग ब्लॉक टाकण्यासाठी 5 लाख, सागर वस्ती डांबरीकरणासाठी 50 लाख, पिंपळगाव तुर्क ते कान्हूर पठार रस्त्यासाठी 2.10 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे.
एवढी सारे कामे करूनही अनेक कामे पेंडिंग आहेत ही राहिलेली सर्व कामे नजीकच्या काळामध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन माननीय लंके साहेब यांनी दिले. ते पुढे म्हणाले की मी जे बोलतो ते करतोच फक्त उद्घाटन करून जात नाही असेही ते बोलले.
लोकनेते निलेशजी लंके साहेब यांचे वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या सूचनेनुसार पिंपळगाव तुर्क येथील नागरिकांनी शाल, श्रीफळ ,बुके, भेटवस्तू देण्याऐवजी गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व वह्या देऊन आदरणीय लोकनेते निलेशजी लंके साहेब यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री सावकार शिंदे यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान प्राचार्य शिंदे यांनी केले.
या विकास कामांसाठी लोकनियुक्त सरपंच सौ सुलोचनाताई शिंदे, प्राचार्य श्री सावकार शिंदे, उपसरपंच श्री इसाक भाई शेख, त्याचबरोबर चेअरमन विजय गवळी, व्हाईस चेअरमन इननुस भाई शेख, माजी सरपंच सरदार भाई शेख ,शिवाजी सागर , त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता.
या कार्यक्रमासाठी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माननीय श्री सतीश कळसकर , पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा. श्री बापूसाहेब शिर्के , कान्हूर पठार गावच्या सरपंच सौ संध्या ताई ठुबे, उपसरपंच प्रसाद नवले, मा. श्री चंद्रभान ठुबे विश्वस्थ कोरठन खंडोबा देवस्थान ट्रस्ट ,राणीताई घुमटकर उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सामाजिक कार्यकर्ते सोंडकर गुरुजी, श्री दत्ता ठाणगे ,चेतन भळगट,नंदकुमार देशमुख, ठेकेदार श्री दिलीपराव पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर मा श्री निशांत बोके साहेब, माजी सरपंच श्री बाच्छुभाई शेख, संस्थापक चेअरमन श्री बाबाजी वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य श्री नवनाथ वाळुंज, वर्षा वाळुंज ,बाळासाहेब वाळुंज, लक्ष्मण वाळुंज, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रताप वाळुंज, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. वि. का. सेवा संस्थेचे संचालक भाऊसाहेब वाळुंज, संजय वाळुंज ,नाना वाळुंज, गफूर भाई शेख, अमोल गवळी सर, चंदू वाळुंज, गवराम वाळुंज गुरुजी, साहेबराव वाळुंज, महिपत वाळुंज, चांदभाई शेख, दत्तात्रय सागर, बबनराव वाळुंज, सोन्याबापु वाळुंज ,प्यारेलाल शेख ,नजीर शेख ,संतोष थोरात, राजेंद्र थोरात ,बाळासाहेब गवळी, बाळासाहेब शिंदे, नाना शिंदे, इब्राहिम शेख, बाबाजी गाडे, रभाजी वाळुंज, सागर वाळुंज मेजर, विशाल सागर मेजर ,आनंद सागर,राजू शेख ,नितीन वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज ,प्रशांत वाळुंज, अशपाक शेख, सौ नाईक मॅडम ,सौ मंदीलकर मॅडम, बायमा शेख तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच या कार्यक्रमासाठी निलेश लंके प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते -युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार माननीय श्री गाडे गुरुजी यांनी मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा