ब्रेकिंग

फसवणूक करून नेलेला ५५,००,०००/- रुपये किंमतीचा १४ टायर ट्रक केला जप्त! मिरजगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई!

मिरजगाव दि. 9 (प्रतिनिधी )
दिनांक १०/०१/२०२४ रोजी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे रावसाहेब धोंडीबा सातपुते, वय ५५ वर्षे, धंदा- शेती, रा. कोकणगाव, ता. कर्जत जि. अहमदनगर यांचे तक्रारीवरून त्यांचे मालकीचा टाटा कंपनीचा LPT ४२२५ मल्टी अक्सल १४ टायर ट्रक नं. MH १६ CD ५५२९ हा फायनान्स कंपनीकडून ४०,००,०००/- लाख रुपये कर्ज घेवून खेरदी केलेला ट्रक फिर्यादी यांनी आरोपी नामे श्रीकिशन अनुरव जाधव रा. आडस ता. केज जि.बीड यास बंधपत्रावर विक्री केला होता. परंतु सदर आरोपीने फायनान्सचे हफ्ते न भरता सदर ट्रक फिर्यादी यांचे संमतीशिवाय परस्पर आरोपी नामे- फारुक उल्ला फाईम उल्ला, रा. गवलीपुरा, ता. जि. अमरावती यास विक्री केला होता. व त्याने देखील फिर्यादी यांची सहमती न घेता ट्रक विकत घेवून फायनान्सचे हफ्ते थकविल्यामुळे फिर्यादी यांची फसवणूक झाल्याने सदर आरोपीतांविरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशन, ता. कर्जत येथे गुन्हा रजि.नं. ०९/२०२४ भादंविकलम ४२०, ५०७, १२०(ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

प्रस्तुत गुन्ह्याचे तपासात आरोपीतांनी साखळी पद्धतीने फियांदी यांचा ट्रक विक्री केल्याचे दिसून आले असून गुन्ह्यातील ट्रक फियर्यादी व पोलीसांपासून लपवून ठेवला होता. तसेच ट्रक कोठे आहे याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्यावरून प्रस्तुत गुन्ह्यात ट्रक खरेदी विक्रीचे एजंट सह असे एकूण ७ आरोपीतांचे नावे निष्पन्न करण्यात आलेली आहेत. गुन्ह्याचे तपासात आरोपी – १) श्रीकिशन अनुरथ जाधव, रा. आडस ता. केज, जि. बीड, २) फारुक उल्ला फाईम उल्ला, रा. गवलीपुरा, ता. जि. अमरावती यांनी तपासात सहकार्य न केल्याने त्यांना अटक करून गुन्ह्याचे तपासात आरोपीांकडे कौशल्यपूर्वक व तांत्रिक तपासाचे आधारे आरोपी क्र. २ चे अमरावती येथील इतर साथीदार नार्म- 3) असलम अय्युब खतीव, वय. 36 वर्षे, रा. जमजम कॉलनी, बीड, जि. बीड, 4) सदर अली सुबान अली, वय 36 वर्षे, रा. भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती. 5) अमन खान सरफराज खान, वय 34 वर्षे, रा. गवलीपुरा, अमरावती. 6) अब्दुल गब्बार अब्दुल खालिक, रा. हैदरपुरा, अमरावती, 7) ख्वाजा फरहानोदिन ख्वाजा राऊफोडीन, रा. मौलापुरा, अमरावती यांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत, तसेच गुन्ह्याचे तांत्रिक तपासात मिरजगाव पोलीस स्टेशनचे तपास पथकाने दारव्हा, ता. दारव्का, जि. यवतमाळ येथून फिर्यादी यांचे मालकीचा ५५,००,०००/- रु. किमतीचा एक टाटा कंपनीचा LPT ४२२५ मल्टी अक्सल १४ टायर ट्रक नं. MH १६ CD ५५२९ ताब्यात घेतला असून गुन्ह्यातील इतर आरोपीर्ताचा
शोध चालू आहे. सदर कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर श्री. प्रशांत खैरे साहेब, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग विवेकानंद वाखारे, यांचे मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश विक्रम पाटील, सफी/अनिल भोसले, पोको सुनिल खैरे, पोकों गोकुळ पळसे व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील नेमणूकीचे पोहेको सोहेल मिझां व पोहेकी किशोर झेंडेकर अशांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुतिल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सफी अनिल भोसले हे करित आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे