निधन
पत्रकार विनायक लांडे यांना पितृशोक

नगर दि.६ जुलै (प्रतिनिधी) : पत्रकार विनायक लांडे व सामाजिक कार्यकर्ते मनोज लांडे यांचे वडील निवृत्ती यादव लांडे (वय 77) यांचे काल (बुधवारी) रात्री 9.15 ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निवृत्ती लांडे हे महापालिकेच्या शिक्षण विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी होते. ते धार्मिक वृत्तीचे होेते. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.